वर्धा पोलिस दलाच्या कन्यांची जागतिक आणि राष्ट्रीयस्तरावर चमक

21 Nov 2025 17:37:15
वर्धा,
wardha police force वर्धा पोलिस दलातील दोन पोलिस कर्मचार्‍यांच्या कन्यांनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये अभूतपूर्व कामगिरी करत पोलिस दलाची आणि जिल्ह्याची मान उंचावली आहे. पोलिस मुख्यालय वर्धा येथे कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल पंकज टाकोने यांची सात वर्षीय कन्या धावपटू आर्या हिने बारामती जि. पुणे येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत जागतिक विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवला. आर्याने ५ किमी अंतर केवळ २४ मिनिटे २२ सेकंद आणि ०१ मिलीसेकंद (२४:२२:०१) या वेळेत पूर्ण केले. इतया कमी वयात जगभरात कोणत्याही धावपटूला ५००० मीटर इतया कमी वेळात पूर्ण करता आलेले नाही. तिच्या या असामान्य कामगिरीची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली जाणार असून, तिचा सत्कार ब्रिटिश पार्लमेंटमध्ये होणार आहे.
 

wardha police 
 
 
सेलू पोलिस स्टेशन येथील पोलिस अंमलदार विक्रम काळमेघ यांची कन्या ईश्वरी विक्रम काळमेघ या १३ वर्षीय चिमुकलीने इंडियन ट्रायथलॉन फेडरेशन आणि मध्यप्रदेश ट्रायथलॉन असोसिएशन प्रकाश तरन पुष्कर भोपाळ येथे आयोजित नॅशनल सब-ज्युनियर ज्युनियर अ‍ॅक्वाथलॉन चॅम्पियनशिप १५ वर्षांखालील मुली अ‍ॅक्वाथलॉन स्पर्धा ईश्वरीने १७ मिनिटं, ५६ सेकंद आणि ७ मिलीसेकंद या वेळेत पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला.wardha police force वर्धा पोलिस दलासाठी ही बाब अत्यंत अभिमानाची असल्याने पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी दोन्ही खेळाडू आणि त्यांच्या पालकांचे विशेष अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राखीव पोलिस निरीक्षक शेख मजीद शेख तसेच क्रीडा प्रशिक्षक राजू उमरे हे उपस्थित होते
Powered By Sangraha 9.0