वर्धा,
mockdrill-wardha : नजिकच्या भूगाव येथील एवोनिथ व्हॅल्यू स्टिल लिमिटेड कंपनीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल टीमच्या उपस्थितीत आपत्कालीन परिस्थितीचा सराव मॉकड्रिल करण्यात आला.
एवोनिथ उद्योग समूहाचे मानव संसाधन प्रमुख आर. के. शर्मा यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलचे डेप्टी कमांडंट अशोक कुमार यांचे स्वागत केले. प्रत्यक्षात टीमतर्फे आपत्कालीन परिस्थतीवर नियंत्रण या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये १२५ अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी कर्मचार्यांना सुरक्षित कसे राहावे, आपत्कालीन परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
या सरावाचा मुख्य उद्देश म्हणजे आपत्कालीन प्रतिसाद प्रक्रियांची चाचणी आणि सराव करण्यासाठी आणि संकटकालीन परिस्थितीचा प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी व कर्मचार्यांची तयारी वाढवण्यासाठी आयोजित केलेला आपात्कालीन सराव होता. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलतर्फे कंपनीच्या या सरावाचे निरीक्षण मूल्यांकन करण्यात आले. तसेच त्यांनी आपत्काल नियंत्रण करण्यासाठी असलेल्या कंपनीच्या तयारीबाबत समाधान व्यत केले. या सरावामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातर्फे अशोक कुमार, ब्रिजेश यादव व चमू, जिल्हा आपत्ती व्यवसथापन विभागाचे शुभम घोरपडे उपस्थित होते. कंपनीतर्फे सुरक्षा विभागाचे राजेंद्र जमाने, सामीन खान, आर. के. शर्मा, आरोग्य विभागाचे चंद्रकांत पुप्पुलवार, डॉ. सुनीत जैन आदींनी सहकार्य केले.