वर्धेत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ

22 Nov 2025 21:27:57
वर्धा,
gautami patils जिल्ह्यातील कलावंतांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कला-सादरीकरणाला हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने वर्धा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन २० ते २६ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. प्रख्यात लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांच्या २१ नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मोठ मोठ्या दिग्गजांच्या सभांसाठी येथील स्वावलंबी मैदान प्रसिद्ध आहे. या मैदानावर आता बाराही महिने शहरातील क्रीडा प्रेमी क्रिकेटचा सराव करतात. तेच त्या मैदानाची निगाही राखतात.
 
 

खासदार  
 
 
सांस्कृतिक महोत्सव आयोजकांनी कार्यक्रमाच्या पुर्वीच या मैदानावरील डेरेदार वृक्षाची कत्तल केल्याने क्रीडा प्रेमी आणि या परिसरात फिरायला येणार्‍यांनी नाराजी व्यत केल्याने सांस्कृतिक महोत्सवाची चर्चा शहरात रंगली होती. दरम्यान, काल शुक्रवारी रात्री आघाडीची लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिकीट घेतलेले प्रेक्षक मोठ्या संख्येने मैदानात दाखल झाले होते. मात्र, प्रचंड गर्दी आणि अपुर्‍या नियोजनामुळे प्रेक्षकांच्या शिस्तीचे पारडे जड ठरले. मागील प्रेक्षकांना मंचावरील कार्यक्रम स्पष्ट दिसत नसल्याने काहींच्या नाराजीचे रूपांतर हाणामारीत झाले. गर्दी अनियंत्रित होताच काही प्रेक्षकांनी एकाच वेळी खुर्च्या फेकाफेक करीत तोडफोड सुरू केली. काही जणांनी संतप्त होत पडदेही फाडले. अचानक झालेल्या या गोंधळामुळे कार्यक्रम काही वेळासाठी थांबवावा लागला. वर्धा सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसर्‍याच दिवशी झालेल्या या प्रकारामुळे आयोजकांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.gautami patils पोलिसांनी तातडीने मैदानात दाखल होत प्रेक्षकांना शांत केले. सुरक्षा पथकाने योग्य तो समन्वय साधत जमावाला नियंत्रणात घेतल्याने वातावरण पुन्हा स्थिर झाले आणि कार्यक्रम सुरळीत सुरू करण्यात आला. पुढील कार्यक्रमांसाठी सुरक्षा आणि व्यवस्थापनात अधिक काटेकोरता आवश्यक असल्याची मागणी प्रेक्षकांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0