वर्धा,
fake currency cases शहरातील गोंडप्लॉट परिसरातील भाड्याच्या घरात सुरू असलेल्या नकली नोट छापण्याच्या प्रकरणात अटक झालेल्या मुख्य आरोपीकडून शहर पोलिस अधिकची माहिती जाणून घेत आहे. या प्रकरणाची साखळी मध्यप्रदेशपर्यंत पोहोचली असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी जबलपूरपासून १०० किमी दूर कटनी जिल्ह्यात छापा टाकून नकली नोट, प्रिंटर, लॅपटॉप व इतर साहित्य जप्त केले आहे.
नकली नोट निर्मिती प्रकरणातील मुख्य आरोपी ईश्वर लालसिंग यादव (३२) हा मुळचा छत्तीसगडच्या राजनांदगाव येथील रहिवासी आहे. तो एक वर्षापासून वर्धा येथील गोंडप्लॉट भागातील केजाजी चौक येथे डॉ. तळवेकर यांच्या घरी भाड्याने राहत होता. तेथेच त्याने नकली नोट छापण्याचा गोरखधंदाही सुरू केला होता. नाशिकमध्ये त्याचे दोन सहकारी पकडल्यानंतर वर्धेतील प्रकरण उघडकीस आले. पण त्याची चाहूल ईश्वरला लागल्याने तो काही साहित्य घेवून वर्धेतून
फरार झाला होता. पण पोलिसांनी त्यास नागपूर येथून ताब्यात घेत अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. पोलिस कोठडीतील ईश्वर याच्याकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासी अधिकारी अधिकची माहिती जाणून घेत आहे. आतपर्यंतच्या तपासात काही गंभीर खुलासेही झाले आहे.fake currency cases आरोपीने दिलेल्या माहितीनंतर पोलिस उपनिरीक्षक प्रमोद रास्कर, इमरान खिलची, महेंद्र पाटील, मंगेश आदे यांचे पथक मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये गेले. कटनी जिल्ह्यात आरोपीने भाड्याने एक रुम घेतली होती. त्याच रुममधून पोलिसांनी ५०० रुपयांच्या ५९६ नकली नोटा, ११० एक बाजूने छापलेल्या नोटा, ११० दुसर्या बाजूने छापलेल्या नोटा आणि १७० अर्धवट छापलेल्या नोटा, १ प्रिंटर, लॅपटॉप, मोबाईल, सिम कार्ड आदी साहित्य जप्त केले आहे. पोलिस तपासात मोठा खुलासा झाला असून आरोपी गेल्या एक वर्षापासून नकली नोट छापण्याचे काम करत होता. तो वर्धा, नागपूर, यवतमाळसह इतर जिल्ह्यांतील नेहमी वर्दळ राहणार्या बाजार पेठेत या नकली नोट चालवत होते. आतापर्यंत त्याने लाखो रुपयांच्या नकली नोटा छापल्या असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. नाशिकमध्ये पकडले गेलेल्यांनाही लवकरच वर्धा पोलिस चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शयता आहे.