डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर गणपतीसमोर नतमस्तक VIDEO

22 Nov 2025 15:45:07
जामनगर,
Donald Trump Jr. bows before Ganesha अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर सध्या त्यांच्या प्रेयसी बेट्टीना अँडरसनसोबत भारतात असून, एनआरआय उद्योगपती राजू मंटेना यांच्या मुलगी नेत्रा मंटेना यांच्या उदयपूरमध्ये होणाऱ्या भव्य विवाहसोहळ्यात सहभागी होण्यासाठी ते येथे आले आहेत. भारत दौऱ्यात त्यांनी जामनगरमध्ये अंबानी कुटुंबाचीही भेट घेतली आणि त्यांच्या पाहुणचाराचा आनंद लुटला. जामनगरमधील वंतारा या वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्राला त्यांनी विशेष भेट दिली. यावेळी अंबानी कुटुंबासोबत त्यांनी पारंपरिक हिंदू संस्कृतीचा अनुभव घेत, एका मंदिरात भगवान गणेशाची पूजा अर्चना केली.

Donald Trump Jr. bows before Ganesha
 
 
अंबानी फॅन पेजवर शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे ट्रम्प ज्युनियर आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत गणेश पूजा करताना दिसतात. मंदिरात सर्वजण अनवाणी उभे असल्याचे आणि श्रद्धाभावाने नतमस्तक झाल्याचे दृश्य विशेष लक्षवेधी ठरले. पूजेदरम्यान प्रथम अनंत अंबानींनी डोके टेकवीत गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर ट्रम्प ज्युनियरची प्रेयसी बेट्टीना अँडरसन पूर्ण भक्तीने मूर्तीसमोर नतमस्तक झाली. काही क्षणांनी ट्रम्प ज्युनियरही तिच्या मागोमाग येत देवदर्शन घेताना दिसले. राधिका मर्चंटही त्यांच्या सोबत पूजा करताना वीडियोमध्ये पाहायला मिळाली.
 
 
 
 
 
या भेटीदरम्यान ट्रम्प ज्युनियर यांनी पांढरा शर्ट, पँट आणि क्रीम रंगाचा कोट परिधान केला होता, तर बेट्टीना लाल ड्रेसमध्ये दिसली. अनंत काळ्या शर्ट-पँटमध्ये तर राधिका पीच रंगाच्या सूटमध्ये असल्याचे दिसले. भारतीय संस्कृतीचा अनुभव घेतल्यानंतर ट्रम्प ज्युनियर यांनी कडक बंदोबस्तात आग्र्यातील ताजमहाललाही भेट दिली. सुमारे एक तास स्मारकात घालवत त्यांनी त्याच्या इतिहास आणि स्थापत्यकलेविषयी मार्गदर्शकाकडून माहिती घेतली. त्यांच्या 2020 मधील आग्रा भेटीची ही पुनरावृत्ती होती. दरम्यान, आणखी एका व्हिडिओमध्ये ट्रम्प ज्युनियर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्यासोबत गरब्यात सहभागी होताना दिसतात. त्यांच्या या भारतीय सांस्कृतिक अनुभवांनी सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0