हिंगणघाटात दोन उमेदवारांविरोधात आक्षेप; प्रकरण न्यायालयात

22 Nov 2025 22:07:09
हिंगणघाट, 
objections-against-candidates : नगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर १८ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी झाली. या छाननीदरम्यान दोन नगरसेवकांच्या उमेदवारी अर्जांवर आक्षेप नोंदविण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी ते आक्षेप फेटाळले व त्यांचे दोन्ही अर्ज वैध ठरविले होते. आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहेे. त्यामुळे दोन्ही आक्षेपांवर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आक्षेपाच्या विरोधात निर्णय आल्यास एकाच प्रभागात दोन उमेदवारांचे भविष्य काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
 
 
Untitled-1
 
संत तुकडोजी वार्ड प्रभाग ५ अ मध्ये भाजपाचे राजू कामडी व ५ ब महिला गटातून मंदा राऊत यांच्या उमेदवारीविरोधात अनुक्रमे संजय नेहरोत्रा व प्रिती कारवटकर यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे लेखी आक्षेप दाखल केला होता. उमेदवार किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य नगरपालिकेचे कंत्राटदार असल्याचा आक्षेप दाखल करीत नियमानुसार त्यांचे नामांकन अर्ज बाद करण्याची मागणी केली होती. याच प्रभागात संजय नेहरोत्रा तसेच रागिणी शेंडे या दोन्ही आक्षेपकर्त्यांनी आपले नामांकन दाखल केले आहेत, हे उल्लेखनिय!
 
 
नेहरोत्रा तसेच रागिणी शेंडे या उमेदवारांनी आता जिल्हा न्यायाधीश- २ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे निर्णयाविरोधात प्रकरण दाखल केले आहे. न्यायालयाने या संदर्भात संबंधितांना २४ रोजी उपस्थित राहण्याच्या नोटीस बजावल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0