विहिरीत पडलेल्या बिबट्याला दिले जीवदान

22 Nov 2025 21:40:04
लाखांदुर,
leopard रात्रीच्या वेळी शिकाराच्या शोधात जंगलातून भरकटून गावाच्या दिशेने आलेला एक बिबट्या शेत परिसरातील निवासी घरालगत असलेल्या विहिरीत पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघड होताच लाखांदुर वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जिवंत बाहेर काढून जंगलात सोडत त्याला जीवदान दिले. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील खोलमारा गावात घडली.
 
 

leopard  
 
 
प्राप्त माहितीनुसार, खोलमारा येथील ईश्वर डोये यांच्या मालकीच्या शेतातील निवासी घरालगत सिंचन विहीर आहे. रात्रीच्या वेळी शिकाराच्या शोधात आलेला बिबट्या भरकटून त्यांच्या घरालगतच्या विहिरीत पडला. विहिरीत पडताच बिबट्याने मोठा आरडाओरडा सुरू केला. सकाळी ईश्वर डोये उठल्यानंतर विहिरीकडून येणारा आवाज ऐकून त्यांनी विहिरीत पाहिले असता त्यांना बिबट्या पडलेला दिसला. त्यांनी त्वरित ही माहिती स्थानिक ग्रामस्थ आणि लाखांदुर वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने, क्षेत्र सहाय्यक आय. एम. सैयद, वनरक्षक चंदन जारवाल यांच्यासह वनकर्मी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तसेच ही घटना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच सहायक वनसंरक्षक संजय मेंढे, सचिन निलख, रितेश भोंगाडे, अड्याळचे वनपरिक्षेत्र अधिकारी महाजन, साकोलीचे पशुवैद्यकीय अधिकारी मेघराज तुलावी, तसेच साकोली-नवेगावबांध-भंडारा येथील RRT पथकही घटनास्थळी दाखल झाले.leopard वन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जाळे व पिंजऱ्याच्या साहाय्याने बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्याची आरोग्य तपासणी करून त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले. शिकाराच्या शोधात गावाकडे आलेल्या आणि विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यासाठी वनविभागाने दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Powered By Sangraha 9.0