विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू

22 Nov 2025 15:58:59
अनिल कांबळे
नागपूर,
electric shock : खापरखेडा येथील जयभोले नगर परिसरात आज सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कपडे वाळवताना विजेचा धक्का बसल्याने माय लेकाचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
 
 
DEATH
 
 
संग्रहित फोटो 
 
 
या दुर्दैवी घटनेत निर्मला उत्तम सोनटक्के (51 वर्षे) आणि त्यांचा मुलगा लोकेश उत्तम सोनटक्के (31 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोकेश हा भानेगाव कोळसा खाणीत एका खाजगी कंपनीत कार्यरत होता. तो रात्रीची शिफ्ट संपवून तो पहाटे घरी परतला होता. रात्रभर काम केल्यानंतर तो घरी येऊन झोपला होता. दरम्यान, सकाळी निर्मला सोनटक्के घरातील कपडे वाळविण्यासाठी बाहेर असलेल्या लोखंडी तारांवर कपडे टाकत होत्या.
 
 
यावेळी त्या तारांच्या वरून गेलेल्या विद्युत वाहिनीचा प्रवाह अचानक तारांमध्ये विद्युत प्रवाह संचारला. त्यामुळे निर्मला यांना जोरदार झटका बसल्याने जोरात ओरडल्या, आईचा आवाज ऐकून झोपलेला लोकेश घाबरून धावत बाहेर आला. आईला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याने तारांना स्पर्श केला असता त्यालाही जबरदस्त शॉक लागला. काही क्षणांतच आई आणि मुलगा दोघेही कोसळले. शेजाऱ्यांनी आवाज ऐकून धाव घेतली, मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात निष्काळजीपणे टाकलेल्या विद्युत वाहिनीमुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0