रणजित कांबळे यांना जिल्ह्यातून काँग्रेस संपविण्याचा ध्यास

22 Nov 2025 22:08:45
हिंगणघाट,
Pravin Upase : नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते रणजित कांबळे यांनी येथील अनुभवहीन व्यतीच्या हाती काँग्रेसची धुरा दिली. वरिष्ठ नेत्यांची अवहेलना करून जिल्ह्यातून काँग्रेस संपविण्याचा ध्यास त्यांनी घेतला असल्याचा आरोप काँग्रेसचे हिंगणघाट विधानसभा प्रमुख प्रवीण उपासे यांनी केला आहे.
 
 
 
 K
 
 
 
वर्धा जिल्ह्यासाठी राजेंद्र मुळक यांची तर हिंगणघाट विधानसभा मतदार संघासाठी यवतमाळचे संजय वानखेडे यांची पक्षाने निरीक्षक म्हणून नियुती केली होती. त्यांनी शरद पवार गटासोबत चर्चा केली असता त्यांनी आघाडी करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आम्ही मुळक यांच्या परवानगीने उबाठाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. उबाठा व काँग्रेसने प्रत्येकी २० नगरसेवक तसेच उबाठा गटाला अध्यक्षपद व काँग्रेसला उपाध्यक्ष पद असा समझोता झाला. याची माहिती राजेंद्र मुळक यांना दिली. त्यांनी मान्यता दिली.
 
 
परंतु, रणजित कांबळे यांनी ही आघाडी बाजूला सारून नगरसेवकपदासाठी मैत्रीपूर्ण लढती व नगराध्यक्षपदासाठी तुतारीला पाठींबा अशी विचित्र आघाडी केली, असा आरोप उपासे यांनी केला. शेवटपर्यंत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना झुलवत ठेवत आघाडी होऊ दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. केवळ १३ जागांवर उमेदवार उभे करून नगराध्यक्षपदासाठी कोणताही योग्य उमेदवार दिलेला नसल्याचेही उपासे यांनी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0