पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर ताडोबात

22 Nov 2025 22:02:34
चंद्रपूर, 
sachin-tendulkar-in-tadoba : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा त्याच्या आवडत्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या दौर्‍यावर आले होते. सोबत पत्नी अंजली तेंडुलकर आणि दोन मित्रांच्या कुटुंबासह ते शुक्रवारी सकाळी 10 वाजता ताडोबात दाखल झाले. दोन दिवसांची जंगल सफारी करून, शनिवारी सायंकाळी ते परतला.
 
 
JKLK
 
मुंबईहून नागपूरमार्गे ते चिमूरजवळील एका रिसॉर्टमध्ये पोहोचले. दुपारी 3 वाजता त्यांनी कोलारा कोअर झोनमध्ये पहिली सफारी केली. त्यांच्या सोबत मित्र जगदीश, नागपूरमधील आणखी एक मित्र आणि त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. सायंकाळी 6.60 वाजता सचिन परत आले, मात्र पहिल्या सफारीत त्यांना एकाही वाघाचे दर्शन झाले नाही. शनिवारी सकाळी आणि सायंकाळी ते दोन सफारी केल्यानंतर रविवारी सकाळची आणखी सफारी करून दुपारी नागपूरमार्गे ते मुंबईकडे परतले. त्यांना वाघाचे दर्शन झाल्याची माहिती आहे.
 
 
 
सचिन तेंडुलकर दरवर्षी ताडोबाला भेट देत असून, येथील वाघांविषयी त्यांना विशेष आकर्षण आहे. कोअर झोनमधील प्रसिद्ध छोटीतारा, बिजली, रोमा, मोगली, युवराज आणि बलराम यांच्या हालचालींबाबत ते नेहमीच रस घेतात. सध्या बिजली वाघिणीला तीन, तर रोमा वाघिणीला चार बछडे असून, रोमा वाघिण पर्यटकांना वारंवार दिसत असल्याने या परिसरात पर्यटनाला विशेष भर पडली आहे.
 
 
ताडोबातील सचिनचा वार्षिक दौरा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. गेल्या वर्षी त्यांनी ताडोबातील एका शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता आणि भेटवस्तूही दिल्या होत्या.
Powered By Sangraha 9.0