मानसा,
Singer Harman Sidhu पंजाबी संगीतविश्वातून एक अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय गायक हरमन सिद्धू यांचे वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी झालेल्या भीषण रस्ते अपघातात निधन झाले असून संपूर्ण संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील ख्याला गावाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, हरमन सिद्धू हे कारने ख्याला गावाकडे परतत असताना त्यांची कार ट्रकला समोरून जाऊन जोरदार धडकली. धडक इतकी प्रचंड होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि सिद्धू यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले, मात्र त्यापूर्वीच ते जीव गमावल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.