सोलरचा ‘झटका’ रोखणार जनावरांचा उच्छाद

22 Nov 2025 19:28:21
पराग मगर
 
नागपूर, 
Solar-AI-Nagpur-Agro Vision जनावरांमुळे पिकांचे होणारे नुकसान हे नागपूरसह विदर्भातील शेतकऱ्यांना भेडसावणारा गंभीर प्रश्न आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा त्रास रोखण्यासाठी नागपुरातील युवांनी सोलर झटका देणारे नवे संशोधन केले आहे. यामुळे जनावरांचा फेंसिंग तारांना स्पर्श होताच त्यांना सौम्य झटका बसतो. यामुळे जनावरे पिकांपासून दूर पळून होणारे नुकसान रोखले जाते. शुभम हेडाऊ यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने ही ‘झटका’ प्रणाली तयार केली असून अग्रो व्हिजनमध्ये हे संशोधन माहितीसाठी ठेवण्यात आले आहे. यश बारापात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार १२ केव्ही बॅटरीसाठी ४० आणि ६० वॅटच्या सोलर पॅनलची सोय यात करण्यात आली आहे. यातून २४ तास ही मशीन सुरू राहते.
 
 
 
 
solar-ai-nagpur-agro-vision
 
 (अग्रो व्हिजनमध्ये आपल्या उपकरणाचं प्रात्यक्षिक दाखविताना युवा संशोधक)
 
Solar-AI-Nagpur-Agro Vision यात ५० च्या वर एकरपर्यंत फेंसिंग करून या तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. पिकांनुसार तसेच परिसरात कोणत्या जनावरांचा फच्छाद जास्त आहे हे पाहून ४ किंवा पाच तारांच्या रांगा लावल्या जातात. विदर्भात बहुतेक भागात माकडं, रानडुक्कर आणि नीलगायींमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान होते. त्यांच्यापासून बचावासाठी वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली यात विकसित करण्यात आली आहे. यामध्ये जनावरांनी फेंसिंगमधून पिकांमध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्यास विद्यूतप्रवाहित तारांना झटका त्यांना बसून ते काहीसे दूर फेकले जातात. यामुळे घाबरलेले जनावर पुन्हा या तारांकडे फिरकत नसल्याचे यश सांगतो.
 
वॉटरप्रूफ प्रणालीचा वापर Solar-AI-Nagpur-Agro Vision
यात संधोधकांनी वॉटरप्रूफ प्रणालीचा वापर केला आहे. त्यामुळे प्रणाली टिकण्याची शक्यता वाढली आहे. तसेच ही प्रणाली सौरऊर्जेवर काम करीत असल्याने वीजबिलाचा खर्चही वाचणार आहे. या प्रणालीत एआय तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जात आहे. त्यामुळे कुठल्या भागात कोणत्या जनावराला झटका बसला याची माहिती वापरकर्त्याला मोबाईलवर मिळणार आहे.
Powered By Sangraha 9.0