बुलढाणा,
illegal-sand-tipper : तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी अवैध वाळूच्या टिप्परला पकडले आहे. घाटाखालून बुलडाण्यात येणार्या वाळू माफियांवर कारवाई दि. २१ नोव्हेंबर रोजी केली. बुलडाणा जिल्ह्यातून वाहणारे २ प्रमुख नद्या आहे. त्यात घाटाखालच्या भागात पूर्णा तर घाटावरील भागात खडकपूर्णा नदी आहे. या नदीपात्रात वाळू माफियांचा साम्राज्य पसरलेला आहे.
बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी वाळू माफिया विरोधात कडक भूमिका घेतल्यानंतर टिप्पर द्वारे वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे. २१ नाव्हेंबरला मध्यरात्री सुमारास बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे व चालक अशोक देवकर गस्तीवर असतांना मलकापूर रोड वरील रिलायंस मॉल समोर त्यांनी एका मिनी टिप्पर क्र. एमएच-१९, सीएस-२८९५ याला थांबवून चालक गोकुळ कांडेलकर याला विचारपूस केली असता त्याने टिप्पर संजय रायबोले रा मलकापूर यांचे असून बर्हाणपूर (मध्यप्रदेश) घाटाची वाहतूक मुदत संपलेले रॉयल्टी दाखवली. त्यामुळे टिप्पर जप्त करून बुलडाणा शहर ठाण्यात जमा करण्यात आले असून मालकावर दंडात्मक कारवाई केली.