लजास्पद...रायसेनमध्ये अपंग तरुणावर केली लघवी

22 Nov 2025 14:01:47
रायसेन,
Urinated on a disabled youth मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. भोपाळलगतच्या मंडीदीप परिसरात एका अपंग तरुणावर एका गुन्हेगाराने उघड्यावर लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. घटनेतील आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याच्या मित्राने हे कृत्य करू नये असा इशारा दिला होता, मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करत अपंग तरुणावर लघवी केली. प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने व्हिडिओ पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचताच चौकशीला गती देण्यात आली. मंडीदीप पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी सुमारे चार वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
Urinated on a disabled youth
 
घटनेनंतर राजकीय वातावरणही तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी सरकारवर थेट टीका करत भाजप सरकारला कायदा-सुव्यवस्थेवरून धारेवर धरले. मध्य प्रदेशात वारंवार अशा घटना घडत आहेत. गुन्हेगारांना सरकारची किंवा पोलिसांची भीती उरलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणाखालील गृह मंत्रालय अस्तित्वातच नसल्यासारखे वाटते, असे पटवारी यांनी म्हटले. त्यांनी भाजप नेत्यांवरही कठोर शब्दांत हल्ला चढवित घटना “लघवी करणाऱ्या प्रवृत्तीची पुनरावृत्ती” असल्याचे सांगितले.
 
 
दरम्यान, मध्य प्रदेशात याआधीही अशा अमानुष घटना घडल्याच्या आठवणी या प्रकरणामुळे पुन्हा ताज्या झाल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये भिंड जिल्ह्यात एका दलित चालकाचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली होती आणि बाटलीतून लघवी पाजण्याचा क्रूर प्रकार घडला होता. त्या प्रकरणानेही राज्यात मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली होती. ग्वाल्हेरचा रहिवासी असलेला पीडित भिंडमधील एका व्यक्तीकडे चालक म्हणून काम करत होता. नवीन घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता आणखी वाढली असून, या मालिकेतील क्रूर घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार प्रभावी पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0