बंगालमध्ये महिला बूथ लेव्हल ऑफिसरची आत्महत्या!

22 Nov 2025 15:39:45
कोलकाता, 
Women booth level officers in Bengal पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विशेष सघन सुधारणा प्रक्रिये दरम्यान कृष्णानगर येथे एका महिला बूथ लेव्हल ऑफिसरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिंकू तरफदार असे या महिलेचे नाव असून तिच्या घरातून एक सुसाईड नोटही पोलिसांना मिळाली आहे. या नोटमध्ये तिने एसआयआर प्रक्रियेमुळे वाढलेल्या प्रशासकीय दबावाला जबाबदार धरत आपल्या मृत्यूला निवडणूक आयोग कारणीभूत असल्याचे स्पष्ट लिहिले आहे. रिंकू तरफदार या कृष्णानगरच्या षष्ठी तलाई भागात राहत होत्या आणि छपरा विधानसभा क्षेत्रातील बूथ क्रमांक 202 वर बीएलओ  म्हणून काम करत होत्या. सुसाईड नोटमध्ये त्यांनी कामाचा प्रचंड ताण, सततचा दबाव आणि बीएलओवर करण्यात येणारी कठोर अपेक्षा यांचा उल्लेख केला आहे. बीएलओकडून जर चूक झाली तर इतका प्रशासकीय दबाव येईल, यावर माझा विश्वासच बसत नाही, असे त्यांनी लिहिले आहे.
 
 
 
महिला बीएलओ ने की खुदकुशी।
 
या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या प्रकरणावर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही घटना अत्यंत दुःखद असून निवडणूक आयोगाच्या दबावामुळे आणखी किती जणांना जीव द्यावा लागणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला. SIR प्रक्रियेमुळे आणखी किती मृतदेह पहावे लागतील? असा थेट प्रश्न त्यांनी आयोगाला विचारला आहे. पश्चिम बंगालमध्ये 4 नोव्हेंबर 2025 पासून SIR प्रक्रिया सुरू झाली असून 4 डिसेंबरपर्यंत ती सुरू राहणार आहे. या काळात बूथ लेव्हल अधिकारी घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेत आहेत, कागदपत्रांची तपासणी करत आहेत आणि मतदार यादीत आवश्यक त्या सुधारणा करत आहेत. उद्देश असा की कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही आणि कोणताही अपात्र मतदार नोंदवला जाणार नाही. मात्र या प्रक्रियेत BLO वर मोठा कामाचा भार टाकला जात असल्याची तक्रार सातत्याने होत आहे. रिंकू तरफदार यांच्या मृत्यूने या प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले असून निवडणूक आयोगाकडून बीएलओ वर होणाऱ्या दबावाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. राज्य प्रशासन आणि आयोग या दोघांकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0