मोबाईल न मिळाल्याने १३ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

23 Nov 2025 15:31:14
अनिल कांबळे
नागपूर, 
student-commits-suicide-in-nagpur खापरखेडा पोलिस ठाणे हद्दीतील चनकापूर गावात शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास एका अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. मोबाईल फोन न दिल्यामुळे निराश झालेल्या मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. दिव्या सुरेश कौठार (१३, चनकापूर) असे आहे.
 
 
student-commits-suicide-in-nagpur
 
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्याने कुटुंबाकडे मोबाईल फोनची मागणी केली होती, परंतु तिला फोन दिला गेला नव्हता. student-commits-suicide-in-nagpur यामुळे ती नाराज होती. शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तिची आई आणि बहीण घराबाहेर बसल्या असताना, दिव्या घरात हॉलमध्ये गेली आणि तेथे नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. जेव्हा कुटुंबीय घरात परतले, तेव्हा दिव्याला फासावर लटकलेले पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ खापरखेडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच खापरखेडा पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून दिव्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली, असून, पुढील तपास सुरू आहे.
मोबाईलचे व्यसन वाढले
गेल्या काही वर्षांत लहान मुलांना मोबाईलचे व्यसन लागले आहे. मोबाईलचा अतिवापर मुलांकडून होत आहे. परिणामतः अभ्यासाकडे दुर्लक्ष आणि डोळे खराब होत आहेत. मोबाईलमधील रिल्स आणि व्हिडिओ बनविण्याचा नाद अनेकांच्या जिवावर बेतला आहे. तरीही मोबाईलचा वापर कमी होताना दिसत नाही. मुलांच्या मोबाईलच्या हट्टापायी अनेकदा पालकांचा नाईलाज होत असतो. मुलांच्या हट्टी स्वभावातून मोबाईलचा वापर वाढतो. परंतु, त्यांना विरोध केल्यास आत्महत्या, घर सोडून जाणे, स्वतःला ईजा करुन घेणे किंवा चक्क हल्ला करण्यासारखे प्रकार घडल्याचे समोर आले आहेत.
Powered By Sangraha 9.0