नागपूर :
Bharat Ganeshpure केंद्रीय मंत्री आणि अॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर विद्यापीठाच्या धर्तीवर उभारलेल्या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाला या वर्षीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्दिष्ट विदर्भाला कृषी क्षेत्रात अग्रेसर बनवणे हेच असून, दरवर्षी शेतकरी आणि कृषीविषयक उद्योजकांसाठी हा महत्त्वाचा मेळावा ठरतो.
प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी अभिनेते भारत गणेशपुरे यांनी अॅग्रोव्हिजनला भेट देत संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी केली. तरुण भारतशी खास बातचीत करताना त्यांनी या उपक्रमाबद्दल मनापासून समाधान व्यक्त केले. नागपूरसारख्या केंद्रस्थानी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी नितीन गडकरी यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. “गडकरीजींनी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहत उत्तम नियोजनाने हे प्रदर्शन उभे केले आहे. ही केवळ प्रदर्शनी नसून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी उभा राहिलेला एक मोठा उपक्रम आहे,” असे ते म्हणाले.
नंबर वन फॅन
गणेशपुरे यांनी Bharat Ganeshpure सांगितले की, स्वतः संपूर्ण प्रदर्शनी पाहिल्यानंतर शेतीसाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रसामग्री, रोपे, कलमे, विविध जातींची फळझाडे, जैविक औषधे इथपासून ते प्रगत कृषी उपकरणांपर्यंत सर्व काही एका छताखाली उपलब्ध असल्याचे त्यांनी अनुभवले. शेतकऱ्यांच्या हितासाठी असे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी विनंतीही त्यांनी गडकरी यांच्याकडे केली. “मी एक अभिनेता म्हणून नाही तर शेतकरी म्हणून नितीन गडकरींचा मोठा चाहता आहे . शेतकऱ्यांच्या भल्यासाठी मी सदैव तयार आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
यंदाच्या अॅग्रोव्हिजनचे Bharat Ganeshpure विशेष आकर्षण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती अवजारे, नव्या पिढीच्या कृषी यंत्रणा आणि चालणाऱ्या वाहनांसारखी उपकरणे. तसेच अॅग्रो टूरिझम, संत्रा-लिंबू विकास, फळ रोपवाटिका, पूर्ती गॅस, अंकूर सिड्स, नैसर्गिक खतांचे स्टॉल आणि भाजीपाला उत्पादन वाढविण्यासाठी उपयुक्त नवीन उपाययोजना अशा विविध विभागांनी प्रदर्शन समृद्ध झाले आहे. नागपूरसह मध्यप्रदेशातील सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी येत पहिल्याच दिवशी गर्दी केली असून, कृषी क्षेत्रातील नव्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांत उत्सुकता दिसत आहे.