मुलींमध्यें अकोला संघ विजयी तर यवतमाळ संघ उपविजयी

23 Nov 2025 20:40:25
बुलढाणा, 
Khokho Championship Competition : बुलढाणा जिल्हा खो-खो असोशिऐशनच्या वतीने येथील जिजामाता क्रिडा व व्यापारी संकुलाच्या मैदानावर संपन्न झालेल्या ४४ वी ज्यूनिअर विदर्भस्तरीय आदिती अर्बन चषक खो-खो स्पर्धेच्या मुलींच्या अंतिम सामन्यात अकोला जिल्हा संघाने यवतमाळ जिल्हा संघावर मात करीत एक गुण व एक मिनिट दहा सेकंदाने विजय संपादन केला. यवतमाळ संघाला उपविजते पदावर समाधान मानावे लागले.
 
 
 
KHO KHO
 
 
 
दि. २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि. २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात अकोला संघ विरूद्ध यवतमाळ संघ यांच्यात अंत्यत चुरशीचा सामना झाला. पहिल्या डावात यवतमाळ संघाने अकोला संघाचे चार गडी बाद केले. त्याबद्दल्यात अकोला संघाने यवतमाळ संघाचे चार गडी बाद केले. मात्र दुसर्‍या डावामध्ये यवतमाळ संघाने चार गडी बाद केले. तर एक मिनिट दहा सेकंद बाकी असतांना अकोला संघाने यवतमाळ संघाचे चार गडी बाद केले. त्यामुळे या स्पर्धेत मुलींमध्ये अकोला संघ अजिंक्य राहिला अकोल्याच्या श्रद्धा नागदिवे, प्राची सरकटे, लक्ष्मी उंबरकर, अरोही रावस्कर, मयूरी धूरंधर, सेजल अवदूत, आरोषी वानखडे, प्रषिका राऊत, ललिता उंबरकर, नयना गावंडे, टिना पारडे, पायल डांगे, कृणाली शिंदे, आनंदी तिडके या खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन संघाला विजय संपादन करून दिला. विजयी संघाला आदिती अर्बनचे अध्यक्ष सुरेश देवकर, विदर्भ खो-खो असोशिऐशनचे प्रा. सुधिर निबाळकर, गजेंद्र रघूवंशी, दिनकरराव चिंचोले, अशोक मोरे, संजय इंगळे, शिवछत्रपती पुरस्कार टी. ए. सौर, मनोज व्यवहारे यांच्या हस्ते आदिती अर्बन चषक देऊन सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यिात आले.
Powered By Sangraha 9.0