कृत्रिम टेकड्यांचा वापर विकास कामांसाठी व्हावा

23 Nov 2025 20:36:46
तभा वृत्तसेवा
गर्रा/बघेडा, 
artificial-hills-development-work : खाणीतून निघालेल्या या माती, खडी, दगडांमुळे कृत्रिम टेकड्या उभ्या झाल्या आहेत. यांचा उपयोग विकासकामांमध्ये करण्याची गरज आहे. असे केल्यास विकासकामांसाठी इतरत्र होणारे उत्खनन व यामुळे होणारा पर्यावरणाचा -हास कमी केला जावू शकतो. तुमसर तालुक्यातील बाळापूर व डोंगरी बु. येथे जगप्रसिध्दी मॅग्नीजच्या खाणी आहेत. येथे उत्खनन करून माती, दगड आणि साप्रेट्स मोकळ्या जमिनीवर टाकले जातात.
 
 
 
J
 
 
 
या प्रक्रियेद्वारे परिसरात मोठमोठ्या कृत्रिम टेकड्या तयार झाल्या आहेत. दरवर्षी या कृत्रिम पर्वतांची उंची वाढत आहे. यामुळे टेकडी परिसरातील गावात अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे या मलब्याचा इतरत्र उपयोग होणे गरजेचे आहे. देशात महामार्गांचे जाळे विस्तारले जात आहे, नवीन रेल्वे मार्ग तयार होत आहेत, आजही अनेक गावांमध्ये काँक्रिटचे रस्ते नाहीत त्यामुळे मोठया प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. याकरिता रेती, माती, मुरूम, दगड आदींचे उत्खनन केली जाते. त्याऐवजी खाणीतून निघालेल्या माती, खडी, दगड इत्यादींच्या कृत्रिम टेकड्यांमधील मलब्याचा विविध विकासकामांमध्ये वापर केल्यास पर्यावरणाचा होणारा -हास कमी केला जावू शकतो. या टेकड्यांमधील दगडांपासून कृत्रिम वाळू देखील तयार करून त्याचा वापर भूमिगत खाणींमध्ये भराव टाकण्याकरिता होऊ शकतो काय? याकडेही प्रशासन लक्ष देण्याची गरज आहे.
Powered By Sangraha 9.0