तभा वृत्तसेवा
भंडारा,
bhandara-bus-stand : बस स्थानक भंडारा येथे बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर बस स्थानक या मोहीमे अंतर्गत नुकतेच तिस-या टप्प्यातील सर्वेक्षण करण्यात आले.
या सर्वेक्षण दरम्यान अमरावती प्रदेश उपमहाव्यवस्थापक पलंगे, यंत्र अभियंता संदिप खवडे, विभागीय वाहतूक अधिकारी शीतल शिरसाठ, विभागीय सांख्यिकी अधिकारी राकेश तलमले, विभागीय अधीक्षक (अप) प्रवीण गोल्हर, भंडारा आगार व्यवस्थापक सारिका लिमजे तसेच सईद शेख, काशिनाथ ढोमणे, सुशील शेंडे याप्रसंगी उपस्थित होते. बसस्थानक कार्यालय येथे मान्यवरांचे फुलझाडे देवून स्वागत करण्यात आले. प्रसंगी शोभिवंत झाडे व रांगोळीद्वारे बस स्थानकाची शोभा वाढविण्यात आली होती.