थकलेल्या कर्जापाई युवा शेतकर्‍याची आत्महत्या

23 Nov 2025 17:12:45
मंगरूळनाथ,
farmer suicide  तालुक्यातील तीर्थक्षेत्र सावरगाव कान्होबा येथील अमोल रमेश महल्ले (वय ४२) या युवा शेतकर्‍याने वडिलोपार्जित थकलेल्या कर्जाच्या विवंचनेत स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
 

farmer suicide debt burden, 
 
 
अमोल महल्ले यांच्याकडे वडिलोपार्जित १ हेक्टर ७२ आर शेतजमीन सावरगाव शेत शिवारात आहे. सन १८-१९ यावर्षी सेवा सहकारी सोसायटी मधून एक लाख पन्नास हजार रुपयाचे कर्ज अमोल महल्ले यांच्या वडिलांनी घेतले होते, जे अद्याप पर्यंत थकीत होते. मागील काही वर्षांपासून अमोल महल्ले यांची एकत्रित कुटुंबाची मदार असलेल्या शेत शिवारातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने व सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज थकल्याने अमोल महल्ले आर्थिक विवंचनेपाई तणावात होते. मृतक अमोल महल्ले यांच्या मागे १३ वर्षाची मुलगी, ९ वर्षाचा मुलगा, पत्नी आणि वयोवृद्ध आईवडील आहेत.
Powered By Sangraha 9.0