कीर्तन हे समृद्ध जीवनाची किल्ली : लता मोहता

23 Nov 2025 20:17:51
हिंगणघाट, 
Lata Mohta : आध्यात्मिक साधना हे सुखी समृद्ध जीवनाचे रहस्य आहे आणि त्यासाठी कीर्तन हे अत्यंत समर्पक माध्यम आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक लतादीदी मोहता यांनी केले.
 
 
LATA
 
संस्कार भारती हिंगणघाट नगरच्या वतीने स्थानिक एसएसएम विद्यालयाच्या पटांगणात राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांच्या जाहीर व्याख्यानाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, संस्कार भारतीचे मार्गदर्शक व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव रमेश धारकर, नगरसंघचालक विनोद नांदुरकर, भूपेंद्र शहाणे उपस्थित होते. स्वा. सावरकर आणि नेताजी सुभाचंद्र बोस यांच्या विचारांवर आधारित तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन येथे करण्यात आले आहे.
 
 
कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर प्रभावी आणि चिंतनशील कीर्तन सादर केले. त्यांनी सावरकरांच्या तेजस्वी व्यतिमत्त्वाची, त्यागमय जीवनाची, राष्ट्रभतीची आणि अद्वितीय विचारांची ओळख भावस्पर्शी कीर्तनातून करून दिली. प्रास्ताविक आणि मान्यवरांचा परिचय नगर अध्यक्ष संजय देशपांडे यांनी करून दिला. संचालन जिल्हा सहमंत्री पराग आजनसरे यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता भारत मातेच्या आरतीने झाली.
Powered By Sangraha 9.0