भाजपाचे झाले काँग्रेसीकरण

23 Nov 2025 21:05:20
नागपूर, 
Supriya Sule : भारतीय जनता पक्ष आता सुसंस्कृत राहिलेला नाही. भाजपाचे काँग्रेसीकरण झाले आहे, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) कार्यकारी अध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांनी आज टीकेचे आसूड ओढले. नागपुरात त्या प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष पूर्वी सुसंस्कृत होता. अटलजींपासून पहाते आहे. ते, अडवाणी, सुषमा स्वराज्य, अरुण जेटली, प्रकाश जावडेकर, प्रमोद महाजन हे संसदपटू होते. सुषमा स्वराज्य यांना मी गुरुस्थानी मानते. हे नेते टीका करायचे. ती ऐकाविशी वाटायची. त्यांच्या वागण्या-बोलण्यात मर्यादा असायची. भाजपाचा सुवर्ण काळ आता संपल्याचे दिसत आहे. त्यांच्या तोडीचा संसद गाजवणारा कुणीच दिसत नाही. आमच्यावर सतत घराणेशाहीचा आरोप करणाèया भाजपात आज घराणेशाही वाढल्याचे दिसते आहे. पंचायत निवडणुकीत एकाच कुटुंबात दिलेल्या उमेदवाèया याचेच द्योतक आहे.
 
 
23-nov-42
 
 
 
भाजपावर सुप्रिया सुळे यांनी टीकेची झोड उठवली. भाजपात आज नैतिकताच शिल्लक राहिलेली नाही. आमदार, मंत्र्यांसह अनेकजणांवर यांनीच अनेक आरोप केले आहेत. त्यांना वॉशिंग मशिनमध्ये टाकून पक्षात नेले. नवाब मलिक स्वाक्षरी करण्यासाठी चालतात, मुंबईचे अध्यक्ष केले, उमेदवारी दिली तर चालत नाही. भाजप सोयीचे राजकारण करीत आहे.
 
 
उमेदवारांचे अविरोध निवडून येणे, शंकास्पद आहे. एकीकडे 51 टक्के मतदान आहे, असे म्हणता ना, मग होऊ द्याना निवडणूक, मत नाही तर निधी नाही, अशा धमक्या कशाला देता, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. यासंदर्भात निवडणूक आयोग काहीच बोलत, करत नसल्याने जनतेत श्रद्धा, अविश्वास दिसतो आहे, असेही त्या म्हणाल्या.
 
 
भाजप विरोधी पक्ष म्हणून हवा आहेत. पण, विरोधी पक्षही दिलदार असावा लागतो. तसे मात्र नाही, असे त्या म्हणाल्या. दुनेश्वर पेठे, प्रकाश गजभिये, प्रवीण कुंटे पाटील पत्रकार परिषदेला उपस्तित होते.
 
सलिल पुन्हा सक्रिय होतील
 
 
सलिल देशमुख यांच्या राजिनाम्यामागे आणि आज अनिल देशमुख यांच्या गैरहजरीमागे गृहकलह असल्याबाबतच्या चर्चेबाबत त्यांनी कानावर हात ठेवले. आम्हा राजकारण्यांना इतरांच्या कुटुंबाबाबत, घराबाबत बोलण्याचा अधिकार नसतो. अनिल देशमुख यांची कालच मुंबईत भेट झाली. ते प्रचारात आहेत. सलिल पुन्हा सक्रिय होतील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Powered By Sangraha 9.0