आदर, सन्मान आणि वेळेचा विचार जीवनात आवश्यक

23 Nov 2025 20:47:36
नागपूर,
vikas-vitthal-mrinali-gautam : पती- पत्नीचे नाते हे जगाच्या पाठीवरील सर्वांत सुंदर नात्यांपैकी आहे. वैवाहिक जीवनाला सुरुवात करण्यापूर्वी मुलगा आणि मुलीने परस्परांची मते, आवडी निवडी जाणून घेणे जितके गरजेचे असले तितकेच हे नाते फुलवण्यासाठी आदर, सन्मान आणि वेळेचाही विचार करणे आवश्यक असल्याचे मत लेखक विकास विठ्ठल आणि मृणाली गौतम यांनी व्यक्त केले.
 
 

VITTHAL 
 
 
 
सिव्हिल लाईन्स,चिटणवीस सेंटर येथे ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टिव्हल मध्ये पुस्तकाच्या प्रसंगी ते बोलत होते. वैवाहिक साक्षरता हा जगभर चर्चेचा विषय असल्याचे अनेक देशांमधल्या विवाह व्यवस्थेचा सखोल अभ्यास करून पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. विवाहेच्छुक मुलगा आणि मुलीने वैवाहिक नात्यात अडकण्यापूर्वी एकत्र बसून काही महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणे आवश्यक आहे.
 
 
लेखिका मृणाली गौतम म्हणाल्या, भारतीय कुटुंब व्यवस्थेची रचना जगाच्या अन्य वेगळी आहे. आपल्या प्रत्येकाची जडणघडण ही कुटुंबात पर्यायाने आई- वडील असलेल्या वैवाहिक जोडप्यांचा अविभाज्य घटक आहे. मात्र आपल्याकडेही पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव पडून घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. सध्या देशात दरवर्षी विवाहाचे प्रमाण ८ टक्के तर घटस्फोटाचे प्रमाण १८ टक्के आहे. त्यामुळे पती- पत्नीचे नाते हा चिंतेचा विषय बनत आहे. हे फुलण्या आधीच जर एकमेकांना समजून बहरता आले तर निश्चितपणे वैवाहिक जीवन सुखी आणि दिर्घायुषी टिकू शकते.
Powered By Sangraha 9.0