टसर सिल्क डिझायनर साड्यांची ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी

23 Nov 2025 20:51:19
नामदेव भदे
नागपूर,
agrovision-agricultural-exhibition : एकीकडे पॉवरलूम उद्योग बंद होण्याच्या असताना धापेवाडा येथे महिलांना हातमाग विणकामाचे प्रशिक्षण दिल्यानंतर आता टसर सिल्क डिझायनर साड्यांची मागणी वाढली आहे. फॅशनच्या दुनियेत टसर सिल्क साड्यांचे महत्व कायम असल्याने अनेक अभिनेत्रींना सुध्दा टसर सिल्क डिझायनर साड्यांचे आकर्षण आहे. अमरावती मार्गावरील नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर मध्य भारतातील सर्वात मोठ्या अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात धापेवाडा टेक्सटाईल्स उद्योग उत्पादक लिमिटेडच्या टसर सिल्क साड्यांच्या विक्री केंद्रावर शेतकर्‍यांसह महिलांचे लक्ष वेधून घेत आहे.
 
 

22-nov-16 
 
 
टसर सिल्क डिझायनर साड्या तयार करण्यासाठी दहा ते बारा दिवस लागतात.त्यामुळे टसर सिल्क साड्यांची किंमत १२ हजारापासून सुरुवात होते. प्रिंटींग केलेल्या कॉटनच्या डिझायनर साड्यांना ग्राहकांकडून सतत मागणी वाढत असल्याने नागपूर येथील विणकर सेवा केंद्राच्या सहकार्याने, सुमारे ३०० हातमाग विणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे आगामी काळात टसर सिल्क साड्यांचे उत्पादन वाढणार आहे.
 
 
नागपूर जिल्हयातील धापेवाडा हे शतकानुशतके पारंपारिक करवत काठी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या वैभवशाली वारशाला आधुनिकतेशी जोडून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे धापेवाडा टेक्सटाईल्स उद्योग उत्पादक कंपनी लिमिटेडची स्थापना सप्टेंबर २०२१ मध्ये करण्यात आली. पॉवरलूम उद्योगाला उभारी देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे धापेवाडा टेक्सटाईल्स उद्योग उत्पादक कंपनी लिमिटेड सुरु करण्यात आल्यामुळे कौशल्य विकासाद्वारे स्थानिक महिलांना प्रशिक्षण मिळाले आहे. कापडनिर्मिती उद्योगाला एक नवीन ओळख निर्माण होत असताना वस्त्रोद्योगाची एक मोठी इमारत आकार घेत आहे.
Powered By Sangraha 9.0