प्रेशर कुकर फुटतोय्!

24 Nov 2025 04:00:05
वेध
- सोनाली पवन ठेंगडी
 
adolescent suicide-crime आज सर्वांसाठी अगदी सर्वसामान्य आणि समसमान ठरलेली समस्या म्हणजे ताण. मग तो कामकाजी लोकांना असो किंवा नोकरदारांना, ताणतणाव कोणालाच चुकलेला नाही. असे तणावात असणारे लोक लहान मुलांकडे पाहून म्हणतात की, यांचे बरे आहे, यांना काही ताण नाही, काही मिळविण्याची धडपड नाही. मस्त निश्चिंत जीवन आहे. पण, दुर्दैवाने आता चित्र बदलले आहे. मागील काही दिवसांमध्ये अगदी दिल्लीपासून नागपूरपर्यंत अनेक शाळकरी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यानी चिठ्ठी लिहून ठेवली की, आम्हाला शिक्षकांकडून त्रास होतोय्. कोणाला शिक्षक नृत्य सरावादरम्यान रागावले, तर कोणाला अन्य काही कारणाने! adolescent suicide-crime पण, हा ताण स्वत:चे जीवन संपवण्याइतका मोठा आहे का? आजकाल तसेही एक किंवा दोनच अपत्य असतात. त्यातही त्यांना तणावामुळे जीवन संपवावेसे वाटत असेल, तर पालकांनी कोणाकडे पाहावे? 10, 13, 16 हे वय हसण्या-बागडण्याचे असताना, त्या वयात स्वत:ला संपवण्याचा विचार या चिमुकल्यांच्या मनात येणे, ही बाब अतिशय भयावह आहे.
 
 
 
 
 
adolescent-suicide-crime
 
 
  
adolescent suicide-crime जेव्हा अशा घटना सातत्याने घडतात, तेव्हा एखादी सामाजिक समस्या आक्राळविक्राळ रूप घेऊन समोर येते आहे का, असे मंथन सुरू होते आणि ते व्हायलाही हवे. आजच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर अनेक घटक परिणाम करतात. शैक्षणिक स्पर्धा, गुणांचे अत्याधिक महत्त्व, करिअरबाबत असलेले अपेक्षांचे दडपण आणि प्रत्येक क्षेत्रात ‘परिपूर्ण’ असण्याची सक्ती... ही काही प्रमुख कारणे आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर भावनिक ताण वाढत जातो. अनेक घटकांमुळे त्यांचा प्रेशर कुकर झालाय् की काय, असे वाटण्याइतपत स्थिती आहे. adolescent suicide-crime याशिवाय शिक्षकांकडून होणारा अपमान, समाजातील घटकांशी तुलना आणि घरच्या वातावरणातील अस्थिरता यांचाही गंभीर प्रभाव त्यांच्या मानसिक आरोग्यावर पडतो. भारतात राष्ट्रीय गुन्हे नोंदणीच्या आकड्यांनुसार, 2023 मध्ये 13,892 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, जे प्रमाण गेल्या दहा वर्षांत सुमारे 65 टक्क्यांनी वाढले आहे. तर 2022 मध्ये ते आकडे 13,044 इतके असल्याचे अहवालात म्हटले आहे.
 
 
 
 
adolescent suicide-crime या वाढत्या आकड्यांनी भारतातील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची स्थिती किती गंभीर झाली आहे, याचे स्पष्ट चित्र समोर येते. दिल्लीतील एका विद्यार्थ्याने शिक्षकांनी अपमान केल्याचे सांगत आत्महत्या केली. मुळात, शिक्षकांचे बोलणे म्हणजे अपमान असतो, ही धारणाच मनाला न पटणारी आहे. शिक्षक, पालक हे मुलांना आकार देणारे, प्रसंगी आधार देणारे घटक असतात. त्यांनी काहीतरी म्हटल्याने विद्यार्थ्यांना तो अपमान वाटावा, हे समाजाचे खरे बदललेले चित्र आहे. पूर्वी ‘छडी लागे छम छम विद्या येई घम घम’ हे गाणे किती आनंदात गायले जायचे. शिक्षकांच्या हातचा आम्ही इतका मार खाल्ला, हे सांगणारी पिढी अजूनही अस्तित्वात आहे. adolescent suicide-crime त्यापैकी अनेकजण आपल्या चांगल्या आयुष्याचे श्रेय शिक्षकांच्या शिस्तीला देतात. आता चित्र बदलले आहे. अर्थात्, नाण्याची दुसरी बाजू देखील आहेच. आज त्या तोडीचे शिक्षकही नाहीत, ही वास्तविकता आहे. पूर्वी शिक्षकी पेशा हे व्रत होते. आता तो दृष्टिकोन राहिलेला नाही. शिक्षकांपासून पत्रकारांपर्यंत जे कोणी व्रत वगैरे म्हणून काम करायचे, ते सारेच कारकून झाले आहेत. त्यामुळे कसेही करून काम हातावेगळे करायचे आणि आजचा दिवस ढकलायचा, ही प्रवृत्ती वाढीस लागली आहे. 
 
 
 
 
adolescent suicide-crime शेवटी तेही कुठेतरी व्यवस्थेच्या तणावाचे भुक्तभोगी आहेतच. पण, याचा अर्थ विशेषत: शिक्षकांनी कोणताही ताण विद्यार्थ्यांवर काढावा, हे योग्य नाहीच. बदलत्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा जास्त काळजीपूर्वक अभ्यास करणे गरजेचे आहे. आज विद्यार्थ्यांवर असणाèया ताणातून त्यांना पालक आणि शिक्षकच बाहेर काढू शकतात. यासाठी दोन्ही घटकांनी या उमलत्या कळ्या-फुलांना नीट समजून घेणे गरजेचे आहे. त्यांना पुरेसा वेळ दिला पाहिजे, त्यांच्या आवडीनिवडींचे निरीक्षण करून त्यात विधायक बदल केला पाहिजे. adolescent suicide-crime बदलत्या काळानुरूप मुलांच्या भावनिक आणि मानसिक जडणघडणीचा प्रवास काहीसा क्लिष्ट, गोंधळलेल्या स्वरूपाचा झाला आहे. त्यांना शांतपणे, समंजसपणे समजून घेणारे पालक आणि शिक्षक हवे आहेत. कारण जे स्वत: शांत आणि समंजस असतील, तेच गोंधळलेल्या बालकांना शांत करू शकतील. आता दिसणारे चित्र बदलावे, हाच यामागील प्रामाणिक उद्देश आहे.
7755938822
Powered By Sangraha 9.0