देवळी,
Dr Pankaj Bhoyar भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ७ मध्ये विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपिठावर आ. राजेश बकाणे, भाजपा नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार शोभा तडस, मिलींद भेंडे, विलास जोशी, महामंत्री राहुल चोपडा, सर्व प्रभागातील सर्व भाजपा उमेदवार उपस्थित होते.
या प्रसंगी पालकमंत्री भोयर म्हणाले की, देवळी शहराचा आजपर्यंत झालेला विकास प्रशंसनीय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सर्वांगीण विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. त्याच धर्तीवर देवळी शहरात आ. राजेश बकाणे यांच्या पुढाकारातून जलतरण तलाव, बगीचा, वाचनालय, बचत गट भवन, समाजभवन उभारणी लवकरच पूर्णत्वास येणार आहे. तसेच नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे मिळण्याचा मार्गही आता मोकळा होणार असल्याचे ना. डॉ. भोयर म्हणाले.
आ. बकाने म्हणाले की, आपल्याला आमदार करण्यासाठी देवळीकरांनी खूप मोठी साथ दिली आहे. आपण या शहराच्या ऋणात असून विकासातून हे उपकार फेडणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा तडस व भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आ. बकाने यांनी केले.
माजी खासदार रामदास तडस
म्हणाले की, ४० वर्षात देवळीचा चेहरा मोहरा बदलला. जनता व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे हे शय झाले. आगामी निवडणुकीत आपल्यावरचा विश्वास कायम राहील याची आपल्याला खात्री आहे. देवळी शहराला विकासाच्या उंच शिखरावर नेण्याकारिता भाजपा उमेदवारांना निवडून देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.