दक्षिण आफ्रिका ३१४ धावांच्या आघाडीवर; भारतासमोर क्लीन स्वीपचा धोका

24 Nov 2025 16:53:58
गुवाहाटी,
India faces the threat of a clean sweep दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही वर्चस्व कायम ठेवत भारतावर दबाव वाढवला. मार्को जॅन्सनच्या विस्फोटक कामगिरीने सामना अफ्रीकी संघाच्या पकडीत आणखी घट्ट बसवला. तिसऱ्या दिवसाखेरीस दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता २६ धावा करत आपली आघाडी तब्बल ३१४ धावांवर नेली. यापूर्वी भारताचा पहिला डाव केवळ २०१ धावांवर संपला आणि त्यामुळे आफ्रिकेला २८८ धावांची प्रचंड आघाडी मिळाली.
 
 
दक्षिण अफ्रीका
 
भारतीय डावाची सुरुवात ९ धावांवरून झाली. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी सुरुवातीला डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण राहुलला केशव महाराजांनी २२ धावांवर बाद करताच भारतीय फलंदाजांच्या पराभवाची मालिका सुरू झाली. ध्रुव जुरेल खातंही उघडू शकला नाही, साई सुदर्शन पुन्हा एकदा अपयशी ठरला, तर कर्णधार ऋषभ पंतकडून अपेक्षित खेळी लाभली नाही. जडेजा आणि नितीश रेड्डीही कमी धावांवर माघारी परतले. या सर्वांमध्ये वॉशिंग्टन सुंदरने महत्त्वाच्या क्षणी ४८ धावा करत झुंजार खेळी खेळली आणि संघाला किमान २०० च्या वर नेले. पण त्यापलीकडे भारतीय संघाला कोणताही ठोस प्रतिकार करता आला नाही आणि अखेर संपूर्ण संघ २०१ धावांवर गुंडाळला गेला.
दक्षिण आफ्रिकेसाठी पहिल्या डावातील उत्कृष्ट कामगिरीचा हिरो ठरला मार्को जॅन्सन. त्याने फलंदाजी करत ९३ धावा ठोकल्या आणि गोलंदाजीत अवघ्या सहा भारतीय खेळाडूंना बाद करून इतिहास रचला. २००० नंतर भारतात येऊन ५० पेक्षा जास्त धावा आणि एका कसोटीत पाचपेक्षा अधिक बळी घेणारा तो तिसरा परदेशी खेळाडू ठरला. कोलकात्यातील पराभवानंतर भारतावर ही दुसरी कसोटीही गमावण्याचा धोका गडद होत चालला आहे. दक्षिण आफ्रिकेची आघाडी ३१४ धावांवर पोहोचल्याने भारतासमोर आता क्लीन स्वीपची भीती निर्माण झाली आहे.
Powered By Sangraha 9.0