भारतीय फलंदाजीचा घोडा पुन्हा अडखळला;चाहत्यांचा निवड समितीवर सवाल

24 Nov 2025 16:59:40
गुवाहाटी,
Indian batting stumbles गुवाहाटी कसोटीत भारतीय फलंदाजी पुन्हा कोसळल्याने चाहते संतप्त झाले असून प्रशिक्षक गौतम गंभीर यांना तातडीने पदावरून हटवण्याची मागणी जोर धरत आहे. भारताने तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात केवळ २०१ धावा केल्या आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावाच्या ४८९ धावांच्या तुलनेत २८८ धावांची प्रचंड आघाडी मिळवली. फॉलोऑनची वेळ येऊनही मेहमान संघाने पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या खराब प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी रोष व्यक्त केला आहे. अनेकांचा आरोप आहे की गंभीर आणि निवड समिती घरगुती क्रिकेटमध्ये कसोटीचा अनुभव असलेल्या फलंदाजांकडे दुर्लक्ष करत आहेत आणि आयपीएलमधील अल्पअनुभवी खेळाडूंना संधी देत आहेत. यशस्वी जयस्वालने ५८ धावा केल्या असल्या, तरी त्याला इतरांकडून साथ मिळाली नाही. केएल राहुल २२, साई सुदर्शन १५, रवींद्र जडेजा ६, ऋषभ पंत ७, नितीश रेड्डी १० धावा करून बाद झाले, तर ध्रुव जुरेल शून्यावर माघारी परतला. वॉशिंग्टन सुंदरने ४८ धावांची लढाऊ खेळी केली, पण ती संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी पुरेशी ठरली नाही.
 
 
 
गंभीर को हटाने
 
या निराशाजनक कामगिरीनंतर एका चाहत्याने लिहिले, “मेहनती रणजी खेळाडूंना संधी न देता आयपीएल स्टारना स्थान दिल्याचा परिणाम सर्वांसमोर आहे.” तर दुसऱ्याने संताप व्यक्त करत लिहिले, “गंभीरला लगेच काढा, नाहीतर ही टीम अजून लाजिरवाणी होईल.” काही जणांनी तर भारत आता घरच्या मैदानावरही कसोटी जिंकू शकणार नाही, असा दावा केला. एका चाहत्याने म्हटले, “वेस्ट इंडिज वगळता प्रत्येक संघ भारतात भारताला हरवू शकतो. श्रीलंकेत आणखी एक मालिका गमावू शकतो. यात शंका नाही.”
 
 
न्यूझीलंडकडून झालेल्या ३-० च्या स्विपनंतर भारताचा कसोटीतील ‘घरचा किल्ला’ ढासळताना दिसत असल्याची चर्चा रंगली आहे. अनुभवी खेळाडूंना वगळून नवख्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या संधीमुळे संघ निवडीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की संघ व्यवस्थापन, निवडकर्ते आणि प्रशिक्षक मंडळी कसोटी क्रिकेटच्या मूलभूत तत्त्वांकडे दुर्लक्ष करत आहेत. सामना अद्याप सुरू आहे, परंतु परिस्थिती भारतासाठी अत्यंत कठीण आहे. ही कसोटी हरल्यास प्रशिक्षक ते निवड समितीपर्यंत सर्वांवर दबाव वाढेल. बरोबरीनंही भारत मालिकेत पराभूत होईल, त्यामुळे विजय हा एकमेव पर्याय उरला आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेची मजबूत आघाडी पाहता, भारतासाठी परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.
Powered By Sangraha 9.0