एसआयआरमुळे ३७ वर्षांनंतर सापडला बेपत्ता मुलगा!

24 Nov 2025 12:13:52
पुरुलिया
Missing boy found thanks to SIR पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात मतदार यादी पुनरावृत्ती (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळजवळ ३७ वर्षांपासून बेपत्ता असलेला विवेक चक्रवर्ती पुन्हा कुटुंबाला सापडला आहे. १९८८ मध्ये अचानक बेपत्ता झाल्यानंतर विवेक चक्रवर्तीच्या कुटुंबाने त्याचा शोध घेतला, पण कुठेही त्याचा पत्ता लागला नाही. मात्र एसआयआर प्रक्रियेदरम्यान त्यांचे कुटुंब पुन्हा एकत्र आले आहे.
 
 
Missing boy found
 
विवेकचा धाकटा भाऊ प्रदीप चक्रवर्ती त्या भागातील बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) आहे. एसआयआर फॉर्मवर त्याचे नाव आणि मोबाईल नंबर सूचीबद्ध होते. कोलकातामध्ये राहत असलेल्या विवेकच्या मुलाने कागदपत्रांसाठी प्रदीपशी संपर्क साधला. सुरुवातीला संभाषण फक्त कागदपत्रांच्या तपासणीपुरते मर्यादित होते, परंतु हळूहळू कुटुंबाचे रहस्य उलगडू लागले. प्रदीपने सांगितले, १९८८ नंतर माझा मोठा भाऊ घरी परतला नाही. आम्ही सर्वत्र शोध घेतला. जेव्हा मुलाची माहिती आमच्या कुटुंबाच्या वैयक्तिक माहितीशी जुळू लागली, तेव्हा मला कळले की मी माझ्या पुतण्याशी बोलत आहे.
 
 
अशा प्रकारे ३७ वर्षांनंतर, विवेक चक्रवर्ती कुटुंबासमवेत पुन्हा भेटला. दीर्घ काळानंतर दोन्ही भाव एकमेकांशी मिळाले आणि भावनांचा पूर सुरू झाला. विवेकने सांगितले, "७ वर्षांनंतर घरी परतणे आणि माझ्या कुटुंबाला भेटणे हा अवर्णनीय आनंद आहे. एसआयआर प्रक्रियेशिवाय हे पुनर्मिलन शक्य झाले नसते, यासाठी मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो असे तो म्हणाला.
Powered By Sangraha 9.0