वर्धा,
charudattabua aflale जननी जन्मभूमीच स्वर्गतपी गरीएसी म्हणजे जन्मभूमी ही स्वर्गा पेक्षा श्रेष्ठ आहे. तिची महता कायम ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे असे आवाहन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कीर्तनकार पं. चारुदत्तबुआ आफळे यांनी केले. संस्कार भारती वर्धा शाखेच्या वतीने रविवार २३ रोजी स्थानिक रंजन सभागृहात वंदेमातरम् या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
कीर्तनकार, आफळे पुढे म्हणाले की, अयोध्येपेक्षा लंका श्रीमंत होती. परंतु, प्रभु रामाने आपल्या जन्मभूमीवर अविरत प्रेम केले म्हणूनच जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. शब्दांनी परिवर्तन होत आहे. शब्द हे प्रभावी साधन आहे. शब्द हे यंत्र तंत्र व मंत्र असून शब्दाचा समाजावर प्रभाव होत असतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये दासबोध, ग्रामगीता, रामायण, भागवत हे साहित्य संपदा या देशाची ग्रंथसंपदा आहे. थोर महापुरुषांच्या विचाराचा अंगीकार केला पाहिजे. त्याचे विचार रुजवले पाहिजे. त्यांच्या मूल्यांचा स्वीकार केला पाहिजे. आजचा युवक मोबाईलच्या अधीन होत आहे. त्यामुळे संस्काराचे जतन होणे आवश्यक आहे. युवक देशाचा आधारस्तंभ आहे. परंतु, आमची युवा पिढी मोबाईलच्या विळख्यात सापडलेली आहे. त्यामुळे पालकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. संस्कारांचे जतन होणे आवश्यक आहे. आजचा विद्यार्थी हा कीर्तन व प्रवचनापासून दूर जात आहे. आपल्या भूमीला माता म्हणून स्वीकार करावा आपल्या मातेचा भूमातेसारखा आदर करावा. त्या भूमीला आईसारखे प्रेम द्यावे. संत महात्म्यांनी याचे विशेष महत्त्व विशद केलेले आहे. ग्रंथ ही वाचली पाहिजे, समजून घेतली पाहिजे त्यामुळे ग्रंथातून मनुष्य घडतो. कादंबरीतून मनुष्य घडत असते.charudattabua aflale साहित्याचे वाचन करा. मानसिक तणावातून मुत राहायचे असेल तर माणसांनी कलेतून आनंद शिकायला पाहिजे. विद्या शिकावी, आयुष्यातला आनंद कलेतून मिळतो. कला ही जगण्याला पाठबळ देते. मनाला आनंद निर्माण करते. राष्ट्रभक्तीच्या परंपरेमध्ये संस्कार भारतीचे योगदान अतुलनीय आहे. वंदे मातरम या राष्ट्रगीतांची सुरुवात कशी झाली, इतिहास कसा घडला कशी व्याप्ती झाली याचा सर्वांगीण ऐतिहासिक मांडणी त्यांनी केली. कार्यक्रमाला संत सयाजी महाराज, विमेन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माधव पंडित, वर्धा नागरी बँकेचे उपाध्यक्ष मंगेश परसोडकर, मकरंद उमाळकर मदन परसोडकर आदींची उपस्थिती होती.