दुचाकी अपघातात पोकाँ संतोष खोडके यांचा मृत्यू

24 Nov 2025 18:48:39
रिसोड,
santosh khodke येथील पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोकाँ संतोष धोंडूराम खोडके (वय ४८) रा. संत तुकाराम नगर रिसोड यांचे २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता च्या दरम्यान रिसोड शेगाव खोडके मार्गावर पवारवाडी नजीक अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. संतोष घोडके हे पोलिस स्टेशनच्या शासकीय कामा निमित्ताने पवारवाडी कडे जात असताना त्यांचा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ते आपल्या दुचाकी बुलेट ने जात होते.
 
 

santosh khodke 
 
 
सदर घटनेची माहिती एका व्यक्तीने रिसोड पोलिस स्टेशनला दिली असल्याने सदर बाब उघडकीस आली. ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी आपल्या कर्मचार्‍यासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. संतोष खोडके यांचा मृतदेह रिसोड येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवाविच्छेदन गृह मध्ये ठेवण्यात आलेला आहे. २४ नोव्हेंबर रोजी शवाविच्छेदनानंतर त्यांचेवर शासकीय इतमात रिसोड येथे निजामपूर स्थित स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण कळू शकले नाही. पुढील तपास रिसोड पोलीस करत आहे.
Powered By Sangraha 9.0