कारंजा लाड,
prajakta chapke संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाद्वारे संचालित अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक (कॉम्प्युटर) विभागाच्या प्रा. प्राजक्ता प्रकाश चापके यांना नुकतीच ‘आचार्य’ (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या व मार्गदर्शिका डॉ. अंजली राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी डेव्हलपमेंट ऑफ मॉडेल फॉर प्रेडिटिंग स्टुडंट सॅटिस्फॅशन ऑफ ऑनलाईन लर्निंग इन हायर एज्युकेशन युजिंग मशीन लर्निंग या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले.
गेल्या १४ वर्षांपासून अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील संगणक विभागात कार्यरत असलेल्या प्रा. चापके यांनी एक कॉपीराइट नोंदवून एक पेटंटही प्रकाशित केले आहे. यासोबतच त्यांनी विविध परिषदा (कॉन्फरन्स) मध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. या संशोधनकार्याकरिता महाविद्यालयातील सर्व पदाधिकारी, प्राध्यापक तसेच त्यांचे पती श्रीकांत शेगोकार यांचे त्यांना उल्लेखनीय सहकार्य लाभले. दरम्यान या यशासाठी प्रल्हाद शेगोकार, शरद सोनटक्के, राहुल चापके, सोनाली चापके, सरस्वती चापके, ज्ञानेश्वर घुडे आदींनी प्रा. प्राजक्ता चापके यांचे अभिनंदन केले आहे.