"आम्ही लग्नानंतर अंतिम संस्कार करू, तोपर्यंत आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा..."

24 Nov 2025 12:25:20
गोरखपूर
son-in-gorakhpur-refuse-to-accept-dead-body उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्यात दोन मुलांनी त्यांच्या आईच्या मृतदेहाला घर आणण्यास  नकार दिला. मोठ्या मुलाने तर्क दिला की त्याच्या मुलाच्या लग्नामुळे मृतदेह घर आणणे ‘अशुभ’ ठरेल.
 
 
son-in-gorakhpur-refuse-to-accept-dead-body
 
त्यानंतर तो म्हणाला  की मृतदेह चार दिवस फ्रीजमध्ये ठेवावा आणि लग्नानंतर अंतिम संस्कार केला जाईल. ही घटना भुवाल गुप्ता आणि त्यांच्या पत्नी शोभा देवी यांच्यासोबत घडली. वर्षभरापूर्वीच मोठ्या मुलाने त्यांना ‘बोज’ म्हणत घरातून काढले होते. अपमानित होऊन या वृद्ध दांपत्याने आत्महत्येचा प्रयत्नही केला, परंतु नंतर त्यांना जौनपूर येथील वृद्धाश्रमात राहण्याची सोय मिळाली. son-in-gorakhpur-refuse-to-accept-dead-body १९ नोव्हेंबरला उपचारादरम्यान शोभा देवीचे निधन झाले. वृद्धाश्रम प्रमुखाने लहान मुलाला आईच्या मृत्यूची माहिती दिली आणि त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे गोरखपूरमध्ये अंतिम संस्कार करण्याची सूचना दिली, मात्र लहान मुलाने मोठ्या भावाच्या लग्नाचा हवाला देत मृतदेह चार दिवस फ्रीजमध्ये ठेवण्याची मागणी केली, जेणेकरून लग्नानंतरच अंतिम संस्कार करता येईल.
 
 
मुलांच्या क्रूर मागण्यामुळे भुवाल भयंकर आहत झाले. सुरुवातीला त्यानी जौनपूरमध्येच पत्नीचा अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला, पण मुलींच्या विनंतीनुसार ते मृतदेह घेऊन गोरखपूर आले. son-in-gorakhpur-refuse-to-accept-dead-body तरीही, मोठ्या मुलाने लग्नाचा हवाला देत आईच्या मृतदेहाला घरात ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. थकून आणि बाध्य होऊन, गावकऱ्यां आणि नातलगांच्या हस्तक्षेपाने भुवाल गुप्ता एका घाटाजवळ कीचकात पत्नीचा मृतदेह दफन करण्यास भाग पाडले गेले. भुवाल गुप्ता रडत म्हणाले, “मी माझ्या पत्नीचा अंतिम संस्कारही करू शकलो नाही. चार दिवसांनी मृतदेहावर कीडे पडतील.” ही घटना नातेसंबंध आणि संस्कारांच्या मूल्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करते.
Powered By Sangraha 9.0