विलास नवघरे
समुद्रपुर,
tiger family तालुक्यातील गिरड खुर्सापार परिसरात एक वाघीण तिचे तिन बछडे व एका वाघासह चांगली दहशत निर्माण केली आहे. दिवसरात्र या वाघांचे दर्शन होत आहे. यातील वाघाला ३० डिसेंबरपर्यंत जेरबंद करण्याची परवानगी वनविभागाला मिळाली आहे. वनविभागाचे अधिकारी कर्मचारी दिवसरात्र या वाघाला पिंजऱ्यात अडकवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दरम्यान स्वतः आ. समिर कुणावार याकडे बारकाईने लक्ष ठेवूत असून ते रोज अधिकाऱ्याच्या संपर्कात आहे.
वाघाला पकडण्यासाठी वापरलेल्या १० जनावरांचा या वाघाने फडशा पाडला तरी देखील हा वाघ वनविभागाच्या हाती लागला नाही. हा वाघ इतका चतूर आहे की शिकार करताच तो जंगल सोडून नागपूर जिल्ह्यातील दुसऱ्या जंगलात पलायन करीत असतो. या वाघांच्या प्रत्यक हालचाली टिपण्यासाठी वनविभागाच्यावतीने जंगलात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले असून दोन ड्रोन कॅमेरे रोज घिरट्या घालत आहे. पन्नासच्यावर अधिकारी कर्मचारी वाघाला पिंजऱ्यात अडकवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. मात्र काही दिवसांपासून गिरड खुर्सापार मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्यांना या वाघाच्या कुटुंबियांचे रोज दर्शन होत आहे.कधी रात्री तर कधी दिवसा वाघीण व तिचे तिन पिल्ले रस्त्यावर असून, झाडावर चढून एकमेकांशी खेळताना दिसत आहे. आतापर्यंत या वाघांकडून ३० च्यावर पाळीव जनावरांना ठार केले असले तरी अद्याप कोणत्याही मनुष्याला इजा झालेली नाही.tiger family आता गिरड खुर्सापार रस्त्यावर रोज अनेकांना व्याघ्र दर्शन होत असल्याने आनंद आहे तरी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील शेतामध्ये कामे सुरू असून वाघाच्या भितीमुळे कामाचा खोळंबा होत असल्याने या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.