आदर्श पदवी महाविद्यालयाची प्रणाली सहारेची कुल्लूच्या साहसी प्रशिक्षणासाठी निवड

25 Nov 2025 17:40:24
गडचिरोली,
nishrita sahare हिमाचल प्रदेशातील पर्यटन आणि साहसी खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुल्लू येथील रिव्हर रॅप्टिंग सेंटर पिरडी येथे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवकांसाठी 10 दिवसीय ॲडव्हेंचर स्पोर्ट्स व डिजास्टर रेस्क्यू प्रशिक्षण कार्यक्रमाला नुकतीच सुरुवात झाली आहे. देशभरातील निवडक स्वयंसेवकांना या प्रशिक्षणासाठी संधी देण्यात येते. या प्रतिष्ठित शिबिरासाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या आदर्श पदवी महाविद्यालय येथील बी. एस्सी. डेटा सायन्स द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी प्रणाली सहारे हिची निवड झाली असून ती महाविद्यालयाचा तसेच विद्यापीठाचा अभिमान वाढविणारी ठरली आहे.
 
 

nishrita sahare 
 
 
 
या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश तरुणांना साहसी उपक्रमांद्वारे शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत बचावकार्य पार पाडण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा आहे. रिव्हर रॅप्टिंग, माउंटेन ट्रेकिंग, रेस्क्यू ऑपरेशन, फर्स्ट एड, लाईफ सेव्हिंग टेक्निक्स यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण घटकांचा या प्रशिक्षणात समावेश आहे. या माध्यमातून तरुणांमध्ये नेतृत्वगुण, टीमवर्क, निर्णयक्षमता आणि आत्मविश्‍वास विकसित होतो. याशिवाय अशा उच्च स्तरावरील प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना साहसी क्रीडा क्षेत्रातील रोजगाराच्या नवीन संधी, पर्यटन क्षेत्रातील करिअर, तसेच सरकारी व स्वयंसेवी संस्थांमधील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित पदांमध्येही करिअरची दारे खुली होऊ शकतात. प्रणाली सहारेच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शाम खंडारे, विभागप्रमुख प्रा. पंकज राऊत, डॉ. प्रीती भांडेकर, तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अंतबोध बोरकर, प्रा. विजया उके यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी तिच्या यशाचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.nishrita sahare तिचा हा सहभाग महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0