locked gram panchayat ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीतील स्थानिक पदाधिकार्यांना विश्वासात न घेता मनमर्जी कारभार करीत आहे. त्यामुळे गावाचा विकास खुंटत असल्याचा आरोप करत सरपंच व उपसरपंचांनीच ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूपबंद केल्याचे प्रकार सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी तालुक्यातील खामखुरा गावात घडले.
मिळालेल्या माहितीनुसार गावातील जुन्या विहिरीवर लोखंडी कठडे बसविण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील सिहोरा येथील लकीश्या इंटरप्राईजेस यांना ऑर्डर देण्यात आली होती. सदर साहित्य गावात आल्यानंतर सरपंच रेखा सयाम व उपसरपंच निप्पल बरैया यांनी ते साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याने लावण्यास मनाई केली होती. मात्र, ग्राम विकास अधिकारी आर. के. भांडारकर यांनी सरपंच व उपसरपंच यांचे म्हणणे धुडकावून लावत मजूरांना विहिरीवरील कठडे लावण्यास सांगितले. ही बाब24 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सरपंच व उपसरपंच यांच्या लक्षात आली. यावर त्यांनी हरकत घेऊन काम करण्यास मनाई केली. ग्राम विकास अधिकारी हे कार्यालयात वेळेवर येत नाही त्यामुळे जनतेच्या दाखल्यांवर सह्या होत नाही, एक दाखला मिळविण्यासाठी पाच ते सहा दिवसाचा कालावधी लागतो तसेच या ग्रामविकास अधिकार्याच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक देणेकरांचे देणे वेळेवर होत नाही. मासिक सभा व ग्रामसभा यांचे झालेले ठराव तीन ते चार महिन्यांनंतर संबंधित विभागाला पाठविले जातात.locked gram panchayat त्यामुळे गाव विकासात अडथळे निर्माण होत असल्याचे आरोप करत सरपंच रेखा सयाम व उपसरपंच निप्पल बरैया यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावले.
आपण याविषयी काहीही सांगू शकत नाही. रेकॉर्ड ग्रामपंचायतीमध्ये कुलूप बंद असल्याने मी काही प्रतिक्रीया देऊ शकत नाही.