भोयर कुटुंबावर काळाची झडप; पती-पत्नी अन् मुलाचा मृत्यू

25 Nov 2025 20:15:08
वर्धा, 
accident-near-selu  : गणेशनगर येथून कार्यक्रम आटोपून भोयर कुटुंब दुचाकीने सेलू काटे येथे स्वगावी परत जात असताना नवोदय विद्यालयाजवळ भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात पती, पत्नी आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला तर सहा वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार २४ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. जखमीला तत्काळ सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 
 
K
 
 
 
मृतकांमध्ये सोमनाथ भोयर (३८), पत्नी निकीता (३२) आणि मुलगा पुरब (१२) यांचा समावेश असून ६ वर्षीय कान्हा हा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेलू काटे येथील सोमनाथ भोयर हे पत्नी आणि दोन मुलांसह गणेशनगर येथे दुचाकीने कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपून ते कुटुंबासह रात्रीच परतीच्या प्रवासाला निघाले होते. दरम्यान, नवोदय विद्यालयाजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी प्रचंड होती की सोमनाथ, निकीता आणि पुरब या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात घडताच वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. चारचाकी वाहन वायगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुलाला तत्काळ सावंगी येथील रुग्णालयात हलविले. डॉटरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. या अपघातात संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याने गावात हळहळ व्यत होत आहे.
 
 
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पसार झालेल्या चारचाकी वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे. ग्रामीण भागात वाढत्या वाहतूक आणि बेदरकार वाहन चालकांमुळे असे अपघात वाढत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यत केली आहे.
Powered By Sangraha 9.0