नागपूर,
BJP city president Dayashankar Tiwari देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोलाचे योगदान दिले आहे. आजच्या युवापिढीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असे आवाहन माजी महापौर व भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केले. भारत सरकारच्या कल्याण मंत्रालयाने नागपूर शहरातील घाट रोडवरील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकता मार्चचे आयोजन केले. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत एकता मार्चची सुरुवात केली. यावेळी ७ वर्षीय आर्या पंकज टाकोणे हीने हिरवी झेंडी दाखविली.

यावेळी जिल्हाधिकारी विपिन इटनकर, शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार खोपडे, आमदार प्रवीण दटके, संजय भेंडे, डॉ. उपेंद्र कोठेकर, रॅली समन्वयक कपिल परमार, अमित मोरे, शिवानी दाणी यांच्यासह प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोड, कुश शर्मा आदी यावेळी उपस्थित होते. एकता मार्चमध्ये विविध राज्यांतील सुमारे ४०० तरुणांनी भाग घेतला. याप्रसंगी शिवानी दाणी यांनी तरुणांना राष्ट्रीय एकात्मतेत योगदान देण्याचे आवाहन केले. रॅलीत सरदार वल्लभभाई पटेल यांचे कटआउट असलेली खुली जीप होती. त्यामागे ३५० बाईकस्वार होते. याशिवाय बसेसमध्ये ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राज्यातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. या एकता मार्चचा समारोप स्टॅच्यू ऑफ युनिटीसमोर होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. नागपूर शहराच्या विविध २८ ठिकाणी फुले उधळून, फटाके फोडून रॅलीचे स्वागत करण्यात रॅलीच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे, संदीप जाधव, विष्णू चांगदे, नरेंद्र बोरकर, रितेश पांडे, अक्षय ठवकर आदींनी परिश्रम घेतले.