काँग्रेस नेते हरिश ग्वालवंशी यांच्यावर गुन्हा दाखल

25 Nov 2025 14:39:59
अनिल कांबळे
नागपूर,
harish gwalvanshi स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात हाेणाऱ्या कळमेश्वर नगरपालिका निवडणुकीला रविवारी गालबाेट लागले. राजकीय वैमनस्यातून एकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्थानिक काँग्रेस नेते आणि माजी नगरसेवक हरिश ग्वालवंशी आणि सहकाऱ्यांवर एका युवकाचे अपहरण आणि मारहाण केल्याचा गुन्हा पाेलिसांनी दाखल केला.
 
 
 
हरीश
 
 
 
 
काॅँग्रेस साेडून भाजपासाठी काम का करत आहेत?, अशी धमकी देऊन अपहरण करत मारहाण केल्या प्रकरणात पाेलिसांनी ही कारवाई केली आहे. आरिफ खान याच्या साेबत शनिवारी रात्री 11च्या सुमारास ही घटना घडली. आरीफ हे कळमेश्वर येथील विसावा बारमध्ये हरिश ग्वालवंशी आणि सहकाèयांना भेटले हाेते. त्यावेळी ग्वालवंशीने ‘तू काँग्रेससाठी काम करत नाही आणि त्याऐवजी भाजपा समर्थकांना पाठिंबा देत आहे, असे म्हणून आरीफशी वाद घातला. त्यानंतर ग्वालवंशी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आरिफचे अपहरण केले. आरिफला जबरदस्तीने कारमध्ये बसवले ते गाेरेवाडा भागात गेले. तिथे आरिफला अमानूष मारहाण झाली.harish gwalvanshi जखमी अवस्थेत आरिफला तिथेच साेडून ग्वालवंशी आणि त्याचे सहकारी पळून गेले. गंभीर जखमी आरिफला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तक्रारीवरून पाेलिसांनी हरिश ग्वालवंशी आणि त्याचे साथिदार राजू साेनारे, आशिष गिरी, राेशन यादव, आशूताेष ग्वालवंशी आणि अनिकेत उईके यांच्याविरुद्ध अपहरण आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. यापैकी आशूताेष ग्वालवंशी आणि अनिकेत उईके यांना पाेलिसांनी अटक केली. त्यांना तीन दिवस पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तर मुख्य आराेपी हरिश ग्वालवंशी फरार आहे.
हरिश ग्वालवंशी आणि सहकाऱ्यांवर अपहरण आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही आराेपींना अटक केली असून ग्वालवंशीसह अन्य आराेपींचा आम्ही शाेध घेत आहाेत.
- मनाेज काळबांडे (ठाणेदार, कळमेश्वर पाेलिस स्टेशन)
Powered By Sangraha 9.0