सुरेख नाट्य सादरीकरणातून इतिहास आणि वर्तमानाचा झाला जागर

25 Nov 2025 22:03:14
नागपूर, 
nagpur-news : राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट एकांकिकांच्या मुख्यमंत्री महाकरंडकं एकांकिका स्पर्धेत मंगळवारी तीन एकांकिका सादर झाल्या. तीनही एकांकिकांचे आशय- विषय वेगळे होते. नाट्य सादरीकरणातून इतिहास आणि वर्तमानाचा मागोवा घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी परिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील आणि अविष्कार दारव्हेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी, डॉ. रवींद्र भुसारी, प्रफुल्ल माटेगांवकर, अशोक समेळ, शकुंतला नरे, सतीश पावडे आदी उपस्थित होते.
 
 
NGP
 
मंगळवारी मुख्यमंत्री महाकरंडकात पहिली एकांकिका अमरावती येथील अद्वैत बहुद्देशीय संस्थेद्वारे सादर झाली. विशाल तराळ लिखित व दिग्दर्शित ’चित्रांगदा’ या एकांकिकेत कथानक मांडण्यात आले आहे. अर्जुनाच्या प्रेमात वेडी झालेली चित्रांगदा यात मांडण्यात आली आहे. अथर्व देशमुख, मनीष कराळे, ओम गोरे, निखिल इंगोले, वेदांत गावंडे, अदिती सोनोने, सृष्टी सरोदे, बालकलावंत अद्वैत तराळ व स्वेहा तराळ यांच्या भूमिका संगीत विष्णू आवंडे, नेपथ्य स्वाती तराळ, रंगभूषा ज्योती करणुके यांनी सांभाळली. संजीवनी पुरोहित, विशाल श्याम देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
 
 
त्यानंतर नागपूरच्या श्री. रामचंद्र बहुद्देशीय संस्थेद्वारे चैतन्य डुबे दिग्दर्शित ’वीर बाबुराव’ ही एकांकिका सादर झाली. १८५७ च्या स्वातंत्र्य समरात ब्रिटीशांविरोधात क्रांतीची मशाल पेटवणारे आणि जंगोम सेनेचा एल्गार पुकारणार्‍या बाबूराव शेडमाके यांचा इतिहास मांडण्यात आला. नेपथ्य प्रशांत शेंडे, पार्श्वासंगीत अमेय डुबे, प्रकाशयोजना ऋषभ धापोडकर, रंगभूषा वेशभूषा सेजल शिंदे यांच्या होत्या. यात चैतन्य डुबे, प्रशांत मंगदे, विजय नंदनवार, आनंद बाळापुरे, किशोर येळणे, जय भुते, स्नेहल निंबारते, काश्वी देशपांडे, पंकज वाघमारे, उर्मिला डुबे, सेजल शिंदे, पंकज घाटोळे, धैर्यशील मेश्राम, संध्या, सतीश बगडे, शिरीष गावडे, आयुष निमसटकर, प्रभू नरोटे, कमलेश माळी, विवेक सोमणकर व बालकलाकार शिवण्या डुबे भूमिका होत्या.
 
 
स्वामी नाट्यांगणतर्फे राजरत्न भोजने व यश नवले लिखित व दिगदर्शीत ’नवरा आला वेशीपाशी’ ही एकांकिका सादर झाली. एकमेकांशी लग्न ठरलेल्या उपवर-वधुची कथा यात मांडण्यात आली आहे. प्रथमेश देवकुळे, रंजना मोरे व शुभम भोवस्कर यांच्या भूमिका होत्या. संगीत निनाद म्हैसाळकर व ओमकार सोनवणे, प्रकाश योजना यश नवले, नेपथ्य गुरव, रंगभूषा व वेशभूषा शुभम जाधव व चैतन्य लोके यांच्या होत्या.
 
सात एकांकिका उद्या
 
 
- मुख्यमंत्री महाकरंडकात बुधवारी सात एकांकिका सादर होतील. सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजताच्या वेळेत बहुजन रंगभूमी, नागपुरतर्फे वीरेंद्र गणवीर लिखित व दिग्दर्शित ’गटार’, गंधर्व बहुद्देशीय संस्था, अमरावतीतर्फे दीपक नांदगावकर लिखित व दिग्दर्शित ’लॉटरी’, थियेटर्स, नागपुरतर्फे चंद्रकांत चौधरी लिखित व यशवंत चोपडे दिग्दर्शित ’दी डार्क एज’, रसाभिनय, अहिल्यानगरतर्फे प्रतिक अंदुरे लिखित व ’काही प्रॉब्लेम ये का?’, माणुसकी मल्टिपर्पज फाउंडेशन, बुलडाणातर्फे रवींद्र इंगळे चावरेकर लिखित व विजय सोनोने दिग्दर्शित ’नामदेव पायरी’, नाट्यरंग, जळगावतर्फे अमोल ठाकूर लिखित व दिग्दर्शीत ’गाईड’, न्यू आर्ट, कॉमर्स अँड सायन्स मालेगाव, अहिल्यानगरतर्फे अपूर्वा काळकुंड लिखित व राखी गोरखा दिग्दर्शित ’पिसाळा’ या एकांकिका सादर होईल.
Powered By Sangraha 9.0