कायदा व सुव्यवस्थेवर यंत्रणांनी अत्याधिक भर द्यावा: जिल्हाधिकारी कुंभेजकर

25 Nov 2025 17:55:50
वाशीम,
dc kumbhejkar निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची सर्वात मोठी जबाबदारी असून, निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखुन सर्व विभागांनी गांभीर्यपूर्वक नियोजनपूर्वक कामकाज करावे. कायदा व सुव्यवस्थेवर यंत्रणांनी अत्याधिक भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
 

kumbhejkar 
 
 
नगरपालिका, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक निवडणूक तयारीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली आज २५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली.यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त बाबुराव बिक्कड उपस्थित होते.तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार व सर्व मुख्याधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले की, मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात बॅरेकेटींग करण्यात यावे. अ‍ॅन्टीसिपेट क्राऊड मॅनेजमेंट करतांना लोकेशन आयडेंटीफाय करत कायदा व सुव्यवस्थेबाबत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार झालेल्या तयारीचा मागोवा त्यांनी घेतला.तसेच आवश्यक सुचनांची तात्काळ कार्यवाही करावी. एसएसटी, व्हीएसटी आणि एफएसटी पथके तात्काळ कार्यान्वित करावीत आणि संबंधित अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करावी असेही निर्देश दिले.
जिपोअ अनुज तारे यांनी एसडीपीओ आणि संबंधित पोलिस यंत्रणेला पोलिंग बुथला रुटीन व्हीजीट सुरु असल्याचे सांगितले.तसेच यादृष्टीने प्रॉम्ट ऍशन सुरु असल्याचे सांगितले.जिल्ह्यात निवडणूक कालावधीत कुठेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा निर्धार यावेळी उपस्थित यंत्रणांनी व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0