पांढरकवडा,
eknath-shinde-campaign-meeting : राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ 26 नोव्हेंबर रोजी पांढरकवड्यात येणार आहेत. शिंदे यांच्या उपस्थितीत दुपारी 11 वाजता क्रीडा संकुलातील मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात सलीम खेतानी गटाने शिवसेनेच्या झेंड्याखाली नगर अध्यक्षपदासह 11 प्रभागांतील 22 उमेदवार उभे केले आहे. शिंदे यांच्या सभेला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शहर अध्यक्ष आतिश चव्हाण यांनी केले आहे.