अस्वल हल्ल्यातील जखमींची वनमंत्र्यांनी घेतली भेट

25 Nov 2025 14:06:34

bear attack victims
 
नागपूर,
Forest Minister meets bear attack victims वनमंत्री गणेश नाईक यांनी मेडिकल नागझिरा वन्यजीव अभयारण्य परिसरात अस्वल हल्ल्यात गंभीर जखमी वनमजुरांची भेट घेतली. मजुरांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन नाईक यांनी दिले. नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील कपाळदेव येथील वनरक्षक माणिकराम चौधरी आणि वनमजूर गुणेश शहारे २२ नोव्हेंबर रोजी सकाळी गस्तीवर होते. एका अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. चौधरी किरकोळ तर वनमजूर शहारे गंभीर जखमी झाले. शहारे यांची प्रकृती गंभीर त्यांना त्यांना पुढील उपचारासाठी नागपुरात मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वनमंत्र्यांना उपचारांच्या प्रगतीबद्दल मेडीकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अविनाश गावंडे यांनी माहिती दिली. वनमंत्र्यांनी प्रशासनाला जखमी मजुरांना उत्तम उपचार देण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्राचे (गोंदिया) उपवनसंरक्षक क्षेत्रसंचालक पियुषा जगताप, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्र (साकोली) उपसंचालक प्रितमसिंग कोडापे प्रामुख्याने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0