eknath shinde गोंदिया शहर राईस सिटी नावानं ओळखले जाते, याठिकाणी मनाने श्रीमंत राहणारी लोक आहेत. ज्यांचे व्हीआयपी कल्चर मोडून आपल्याला सर्वसामान्यांना न्याय देत विकास करणारा सर्वसामान्य व्यक्ती नगराध्यक्ष, नगरसेवक म्हणून निवडून पालिकेवर शिवसेनेच्या रूपाने भगवा फडकवायचा आहे. गोंदिया नगराच्या सर्वांगीण विकासाठी नगरविकास विभाग निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शहरातील नगरपरिषद इंदिरा गांधी क्रीडांगणात मंगळवार 25 नोव्हेंबर रोजी नगरपरिषद निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभेत शिंदे बोलत होते. सभेला राज्यमंत्री आशिष जायस्वाल, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. प्रशांत कटरे, माजी आमदार सहसराम कोरोटे, इंजि. सुगत चंद्रिकापुरे, रुपेश कुथे, राजीव ठकरेले, सुरेंद्र नायडु आदिंसह गोंदिया, तिरोडा नगरपरिषद व सालेकसा, गोरेगाव नगरपंचायतीचे उमेदवार उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले, गोंदियाच्या सर्वांगिण विकासाठी परिवर्तन हवा आहे. व्हीआयपी संस्कृति मोडून काढायची आहे. सर्वसामान्यांना न्याय द्यायचा आहे. येथील प्रस्थापितांंचे किती लाड पुरविणार असा प्रश्न उपस्थित करीत हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्याची हिच वेळ आहे. प्रस्थापितांनी निव्वळ ठेकेदारीसाठी शहराचे वाटोळे केले, त्यांना दूर सारण्याची वेळ आली आहे. विधानसभेच्या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा योगदान राहिलेला आहे. त्यांच्या आरोग्यासाठी व त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आम्ही वचबद्ध आहोत, सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी असो की गोमातेच्या रक्षणासाठी सातत्याने काम करणारे आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी लढणारे डॉ. प्रशांत कटरे नेहमी हिंदुत्वाच्या बाजूने लढायला पुढे असतात. त्यामुळे गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्यासह त्यांच्या 34 सहकार्यांना विजयी करायचे आवाहन केले. गोंदियाच्या विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून आम्ही संकल्प सोडला आहे. शहराला भेडसावणारा स्वच्छतेचा व पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे.eknath shinde शहरातील रस्ते दुरुस्त करायचे आहेत. स्वच्छता, पाणी आणि प्रदुर्षणाच्या रुळावरुन घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणायची आहे. त्यासाठी सर्वांनी शिवसेनेला साथ द्यावी, नगरपरिषदेच्या नव्या इमारत बांधकामासाठी लागणारा निधी देण्याची ग्वाहीही शिंदे यांनी शहरवासीयांना दिली.