वर्धा,
fake-note-printing-case : बनावट नोट छपाई प्रकरणातील मुख्य आरोपी ईश्वर यादव (३२) याची पोलिस कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी तपास अधिकार्यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने ईश्वरच्या पोलिस कोठडीत २८ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.
बनावट नोटा छपाई प्रकरणात आतापर्यंतच्या तपासात शहर पोलिसांनी केजाजी चौक गोंडप्लॉट येथील डॉ. तळवेकर यांच्या घरातून आणि मध्यप्रदेशातील कटनी येथील भाड्याच्या खोलीमधून बनावट नोटा, विविध साहित्य तसेच मोबाईल आणि सिमकार्डही पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणाचा तांत्रिक तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. ईश्वरचे कुणाकुणाशी कनेशन होते, त्याने कुठे किती बनावट नोटा चालविल्या आदींची माहिती तपासी अधिकारी घेत आहेत. वाढीव पोलिस कोठडीत हे प्रकरण कुठले नवीन वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.