जीवितेश गवळी आणि संस्कृती शेटे राज्यस्तर चित्रकलेत स्पर्धेत विजेते

25 Nov 2025 19:18:18
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
state-level-painting-competition : सांस्कृतिक कार्य विभाग व वस्तूसंग्रहालय संचालनालय मुंबई अंतर्गत मध्यवर्ती संग्रहालय नागपूर येथे जागतिक वारसा सप्ताहानिमित्त युनेस्कोद्वारा महाराष्ट्र राज्यातील 11 व तामिळनाडूतील एक अशा 12 किल्ल्यांना सामूहिक नामांकन प्राप्त झाले आहे.
 
 
 
ytl
 
 
 
त्या किल्ल्यांना प्रचार प्रसार कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार, 24 नोव्हेंबरला चित्रकला स्पर्धेचे राज्यस्तर आयोजन करण्यात आले. स्मॉल वंडर हायस्कूल वडकी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळच्या विद्यार्थ्यांनी यात बाजी मारली वयोगट 13 ते 21 या अंतर्गत जीवितेश आशिष गवळी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर संस्कृती सचिन शेटे हिला तिसरा क्रमांक देण्यात आला.
 
 
चित्रकला शिक्षक पुष्पक रवींद्र महुरले यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. शाळेच्यावतीने प्राचार्य डॉ. मंजूषा सागर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. स्मॉल वंडर हायस्कूलचे सर्व शिक्षक वृंद शिक्षक पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले. यवतमाळ जिल्ह्यातील ही एकमेव शाळा आहे, असे आयोजकांनी सांगितले विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
Powered By Sangraha 9.0