नागपूर,
ganesh-naik : राज्यातील वनपालांची रखडलेली पदोन्नती आता होणार असल्याचे ठोस आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी संघटनेच्या वतीने सिव्हील लाइन्स येथील हरिसिंग सभागृहात वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेत आपल्या मागणीचे एक निवेदन वनमंत्री गणेश नाईक यांना देण्यात आले. त्यावेळी त्यांनी वनपालांची प्रलंबित वनक्षेत्रपाल पदी पदोन्नती होणार असल्याचे सांगितले. यावेळी निवेदन देण्यासाठी प्रामुख्याने विलास कोसनकर अरुण पेंदोरकर, रमेश घुटके, अनंत राखुंडे, दिनेश तेलंग, मनोज रामटेके, देशमुख डी. टी. चौधरी, दिनेश नंदेश्वर, नामदेव केंद्रे, शेषराव नारनवरे, राममोहन पेदापल्लीवार, मेघराज निबुद्धे आदी वनपाल उपस्थित होते.
राज्यभरात वनक्षेत्रपालांची २२६ पदे रिक्त असून वनसंरक्षण, वनसंवर्धन करणे आणि मानव - वन्यजीव संघर्ष आदी ठिकाणी वनपालांची प्रलंबित वनक्षेत्रपाल पदोन्नती आवश्यक आहे. निवड व विभाग वाटप झालेल्या १२९ वनपालांची वनक्षेत्रपाल पदी आदेश पारित करण्यात येईल, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.