बनावट औषधांची विक्री करणाऱ्या आणखी दाेघांना अटक

25 Nov 2025 22:05:25
अनिल कांबळे
नागपूर, 
sale-of-fake-medicines : गेल्या तीन दिवसांपूर्वी इतवारीतील एका मेडिकल शाॅपवर अन्न व औषध प्रशासन आणि पाेलिसांनी छापा घातला हाेता. या छाप्यात दाेघांना अटक करण्यात आली हाेती तर दाेन जण फरार झाले हाेते. पाेलिसांनी फरार आराेपींना मध्यप्रदेशातील सतना शहरातून अटक केली. शिवेंद्र उफर् शिब्बू श्रीनाथ वर्मा ( गराेबा मैदान ,लकडगंज) आणि आमीर मेहमूद शेख (माटे चाैक, गराेबा मैदान) अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. यापूर्वी तुषार पवन अग्रवाल (इतवारी) आणि भरतकुमार दीपककुमार अमरनानी(यशाेधरानगर) यांना अटक करण्यात आली हाेती.
 
 
 
FAKE
 
 
विनापरवानगी आणि डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंदी असलेल्या आणि गुंगी आणणाèया औषधांची विक्री करता येत नाही. मात्र, अशा औषधांची विक्री करणाऱ्या इतवारीतील मासूरकर चाैकातील भगवती मेडिकल स्टाेअर्सवर अन्न व औषध प्रशासनाने छापा घातला. या दुकानातून दीड लाखांची गुंगी आणणारी औषधे जप्त केली. धक्कादायक बाब म्हणजे साठवणुकीचा काेणताही परवाना नसताना या विक्रेत्याने माेठ्या प्रमाणात घरातच नशेच्या औषधांचे गाेदाम बनवले हाेते. आर्थिक फायद्यासाठी नागरिकाच्या आराेग्याला हानिकारक विना परवाना प्रतिबंधीत औषधे विकणाऱ्या तुषार पवन अग्रवाल आणि त्याला ही औषधे पुरवणारा वितरक भरतकुमार दीपक अमरवाणी विराेधात लकडगंज पाेलिसांनी गुन्हा दाखल करत दाेघांनाही अटक केली हाेती. त्यांना बनावट औषधांचा पुरवठा करणारे दाेन आराेपी शिवेंद्र उफर् शिब्बू श्रीनाथ वर्मा आणि आमीर मेहमूद शेख या दाेघांनी शहरातून पळ काढला हाेता. त्या दाेघांचा लकडगंज पाेलिस शाेध घेत हाेते. त्या दाेघांनाही मध्यप्रदेशातील सतना शहरातून अटक केली.
 
अशी केली कारवाई
 
इतवारीतल्या मासुरकर चाैकातील भगवती मेडिकल स्टाेअर्समधून गुंगीची औषधे विक्री हाेत असल्याची कुणकूण अन्न व औषध प्रशासनाला लागली हाेती. बनावट ग्राहक पाठवून तुषार अग्रवालकडे गुंगीचे औषधे मागण्यात आले. अग्रवालने ती पुरवताच टीमने छापा टाकत काेडीन फॉस्फेट, कायडेन कफ सिरपच्या 12 बाटल्या आणि वन रेक्स कफ सिरपच्या 59 बाटल्या जप्त केल्या. चाैकशी केली असता त्याने गुंगीची औषधे भरतकुमार अमरवाणीने दिल्याचे कबूल केले. जुना बालाजी मंदीर राेडवरील परसाेडकर केटरर्सच्या पाठीमागील घरात ही औषधे ठेवल्याचे त्याने सांगितले. पथकाने तिथेही छापा टाकत 91 हजारांच्या राेख रकमेसह गुंगी आणि बधीर करणाèया 12 प्रकारच्या प्रतिबंधित औषधांचा दीड लाखांचा साठा जप्त केला.
 
 
शहरातल्या अनेक भागांत खुलेआम विक्री हाेणाऱ्या गुंगीच्या औषधांच्या विक्री हाेत आहे. यात खाेकल्यासाठी वापरले जाणारे काेडीन फॉस्फेटयुक्त विशिष्ट कफ सिरपसह, काेडीम, केडी स्टार एक्स, अल्प्रा झाेलामसह, इझेथ्राेमायसीन, हायड्राॅक्सि क्लाेराेक्विन, डायझी्राम, ट्रिप्टाेमायसीन सारखी औषधे प्रिस्क्रिप्शन शिवाय विकली जात आहेत.
 
 
बनावट औषधांची मोठ्या प्रमाणात विक्री
 
 
किरकाेळ दुकानातून मिळणारी शेड्युल एच प्रकारातली प्रत्येक गाेळी, औषधांचा बॅच क्रमांक आणि ती सुचविणाèया डाॅक्टरचा नावासह नाेदणी क्रमांक पावतीवर नाेंदवावा लागताे. मात्र, शहरातल्या विशिष्ट भागात खाेकल्यासाठी वापरले जाणारे विशिष्ट कफ सिरप आणि अन्य प्रतिबंधित औषधांची माेठ्या प्रमाणात विक्री हाेत असल्याचे समाेर आले आहे.
Powered By Sangraha 9.0