पाटणा,
Rabri Devi : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना त्यांचे १० सर्कुलर रोड येथील सरकारी निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस मिळाली आहे. लालू कुटुंब गेल्या २८ वर्षांपासून या बंगल्यात राहत आहे. इमारत बांधकाम विभागाने त्यांना निवासस्थान रिकामे करण्यास सांगितलेली नोटीस पाठवली आहे. यासोबतच, राबडी देवी यांना एक नवीन बंगलाही देण्यात आला आहे.
वन बांधकाम विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, त्यांना आता ३९, हार्डिंग रोड, पाटणा येथील सरकारी निवासस्थानात हलवण्यात आले आहे. त्यामुळे, राबडी देवींना आता त्यांचे १० सर्कुलर रोड येथील पूर्वीचे निवासस्थान रिकामे करावे लागेल.